TRENDING:

पब्जी खेळता खेळता सुरू होता भयावह कट, अल्पवयीन मुले सेफ नाहीत; देशाला हादरवून टाकणारी घटना

Last Updated:

Online Games And Terrorism: पब्जीसारख्या गेम्सचा वापर केवळ करमणुकीसाठीच नाही, तर दहशतवादी संवादासाठीही होतो आहे. पाकिस्तानच्या आयएसआयने आणि दहशतवादी संघटनांनी या गेमिंग प्लॅटफॉर्म्सचा वापर करून भारतातील तरुणांना लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
श्रीनगर: पब्जीसारख्या ऑनलाइन गेम्समध्ये अनोळखी किंवा इतर सहकाऱ्यांशी संवाद साधण्याची गरज असते आणि आता याच वैशिष्ट्याचा वापर दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI जम्मू-काश्मीरमधील आपल्या सदस्यांशी संवाद साधण्यासाठी करत आहेत, अशी धक्कादायक माहिती अधिकार्‍यांनी दिली.
News18
News18
advertisement

अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, सीमेपलीकडील दहशतवादी संघटना पारंपरिक सोशल मीडिया आणि संवाद माध्यमांच्या ऐवजी सुरक्षा यंत्रणांच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी या आभासी युद्धभूमीचा खऱ्या संवादासाठी उपयोग करत आहेत. अशा प्रकारच्या चार घटना समोर आल्या आहेत.

एका प्रकरणात अल्पवयीन मुलाला सीमेपलीकडचा त्याचा गेममधील सहकारी कट्टरपंथाकडे झुकवत होता. योग्य समुपदेशनानंतर त्या मुलाला त्याच्या पालकांच्या हवाली करण्यात आले, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

advertisement

गेमिंग चॅट अ‍ॅप्स खेळाडूंना गेम खेळण्याच्या आडून रिअल टाइम संवादाची सुविधा देतात. मात्र अधिकार्‍यांनी नेमकं कोणता खेळ वापरण्यात आला याचा उल्लेख केला नाही, तसेच त्याचा वापर कसा झाला याबाबतही माहिती दिली नाही.

हे अ‍ॅप्स टीमवर्क, रणनीती आणि सामाजिक संवादासाठी व्हॉईस, व्हिडिओ आणि मजकूर स्वरूपातील संवाद पुरवतात. त्यामुळे यांचा उपयोग वेगवेगळ्या हेतूंनी केला जातो.अधिकार्‍यांनी सांगितले की, अशा संवादांमध्ये संभाव्य सदस्यांची ओळख खेळाच्या दरम्यानच होते आणि मग त्यांच्यावर कट्टरपंथी विचार लादले जातात.

advertisement

हे गेमिंग अ‍ॅप्स संवाद सुरक्षित ठेवण्यासाठी एन्क्रिप्शनचा वापर वाढवत आहेत. काही गेम्स बेसिक इन-गेम व्हॉईस चॅटसाठी एन्क्रिप्शन वापरतात तर काहींमध्ये मजकूर व आवाज दोन्हीसाठी प्रगत एन्क्रिप्शन असते.

हे अ‍ॅप्स जरी भारतात बंदी घालण्यात आलेले असले तरी VPN चा वापर करून बेकायदेशीरपणे डाऊनलोड केले जातात. VPN इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅड्रेस लपवतो, ज्यामुळे ऑनलाइन हालचाली शोधणे आणि डेटा गोळा करणे कठीण होते.

advertisement

याआधीही दहशतवादी आणि त्यांच्या पाकिस्तानी समर्थकांनी WhatsApp सारख्या अ‍ॅप्सचा वापर थांबवून इतर अ‍ॅप्सचा उपयोग सुरू केला होता. यात एका तुर्की कंपनीने विकसित केलेल्या अ‍ॅपचा वापर होत असल्याचेही सांगण्यात आले आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे अ‍ॅप अत्यंत कमी इंटरनेट स्पीडवर कार्यरत राहतं, अगदी EDGE किंवा 2G नेटवर्कवर देखील.

5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. सर्व एन्क्रिप्शन आणि मेसेज प्राप्त करण्याच्या प्रक्रिया उपकरणावरच पार पडतात. त्यामुळे तृतीय पक्षाचा हस्तक्षेप कमी करता येतो. हे अ‍ॅप RSA-2048 एन्क्रिप्शन अल्गोरिदमचा वापर करतात, जो सर्वाधिक सुरक्षित मानला जातो.

advertisement

RSA ही अमेरिकन नेटवर्क सिक्युरिटी आणि प्रमाणीकरण कंपनी आहे. याची स्थापना 1982 मध्ये रॉन रिवेस्ट, लिओनार्ड एडलमन आणि आदि शामीर या तिघांनी केली होती. RSA हे नाव जगभरातील एन्क्रिप्शनचे प्रमुख नाव मानले जाते. या नव्या अ‍ॅप्सचा वापर करताना फोन नंबर किंवा ईमेलचीही गरज लागत नाही. त्यामुळे वापरकर्त्याची ओळख पूर्णतः गुप्त राहते. ही नव्या प्रकारची आव्हानं अशा वेळी समोर येत आहेत. जेव्हा खोऱ्यातील सुरक्षा यंत्रणा वर्च्युअल सिम कार्ड्सच्या धोक्यांशी लढा देत आहेत.

दहशतवादी संघटना पाकिस्तानातील आपल्या आक्यांशी संपर्क साधण्यासाठी वर्च्युअल सिम कार्ड्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. ही सिम कार्ड्स विदेशी सेवा प्रदात्यांमार्फत तयार केली जातात.

या तंत्रज्ञानात संगणक एक टेलिफोन नंबर तयार करतो आणि वापरकर्त्याला त्याच्या स्मार्टफोनवर एक अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून वापर सुरू करावा लागतो.

या तंत्रज्ञानाचा उपयोग 2019 मध्ये समोर आला. जेव्हा पुलवामा येथे CRPFच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने वर्च्युअल सिम वापरल्याचं उघड झालं. त्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या तपासात समोर आले की फक्त पुलवामा हल्ल्यातच 40 हून अधिक वर्च्युअल सिम कार्ड्सचा वापर झाला होता. अधिकारी म्हणतात की, अशा अनेक सिम कार्ड्सचा वापर काश्मीरच्या सायबर स्पेसमध्ये होतोय, ही शक्यता नाकारता येत नाही.

मराठी बातम्या/देश/
पब्जी खेळता खेळता सुरू होता भयावह कट, अल्पवयीन मुले सेफ नाहीत; देशाला हादरवून टाकणारी घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल