हाशिम मुसा कोण होता?
हाशिम मुसा हा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी संबंधित असून भारतात अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये तो सक्रिय होता. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचे बळी गेले होते आणि त्यामागे मुसाचं मास्टरप्लॅनिंग असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी उघड केलं होतं.
हरवानमधील घनदाट जंगलात भीषण चकमक
सोमवारी सकाळी हरवानजवळील दचिगामच्या जंगलात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ‘X’ वर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी म्हटलं, तीव्र चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ऑपरेशन अजून सुरू आहे.
advertisement
एक महिना चाललेली शोधमोहीम
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षाबलांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली होती. यामध्ये गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयातून सतत माहिती संकलन सुरू होतं. याच माहितीच्या आधारे काही दहशतवादी हरवान आणि दचिगामच्या दिशेने गेल्याचं समजलं होतं. ही ठिकाणं श्रीनगरपासून अवघ्या 20 किमी अंतरावर आहेत.
ही कारवाई करत लष्कराने फक्त दहशतवाद्यांचा खात्माच केला नाही. तर एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कला जबरदस्त धक्का दिला आहे.
