राहुल गांधींनी म्हटलं की, पंतप्रधानांना समजत नाहीय की देशात काय होतंय. त्यांना जाता येत नाहीय त्याला कारण समजू शकतो पण मणिपूरबद्दल बोला. मणिपूरमध्ये जे होतंय ते रोखायला भारतीय लष्कराला दोन दिवस लागतील. त्यांना फक्त आदेश द्या ते दोन दिवसात होईल. पंतप्रधानांना मणिपूर जाळायचं आहे त्यांना हे रोखायचं नाहीय असा आरोपही त्यांनी केला.
advertisement
लोकसभेत पंतप्रधान मोदींनी केली भविष्यवाणी, विरोधकांना दिलं ओपन चॅलेंज, म्हणाले…
मणिपूरमध्ये लोकांना मारलं जातंय. महिलांवर अत्याचार होतोय. राज्य उद्ध्वस्त केलं जातंय. हे फक्त भाजपच्या राजकारणामुळे होतंय. फोडा आणि राज्य करा. भारत मातेची हत्या केली जातेय. मी भारत माता ही भारताची कल्पना आहे. या भारतमातेची हत्या केली जातेय असं मी म्हणालो. आपण भारतमाता शब्द संसदेत उच्चारू शकत नाही का? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला.
मोदी लोकसभेत निर्लज्जपणे हसत होते. मणिपूर जळत रहावं अशी त्यांची इच्छा आहे. पंतप्रधानांनी एखाद्या पक्षाचा नेता म्हणून वागू नये. ते आपले प्रतिनिधी आहेत. पण पंतप्रधान दोन तास काँग्रेसबद्दलच बोलत होते. काँग्रेस, भाजपशिवाय इतरही पंतप्रधान पाहिले पण असं कोणीही बोललं नाही असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
राहुल गांधीच्या भाषणावेळी त्यांच्याऐवजी सभापतींच्या चेहऱ्यावर जास्तवेळ कॅमेरा ठेवला गेला. याबाबत विचारलं असता राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांना माझा चेहरा बघायचा नसेल. पण विरोधाभास असा होता की पंतप्रधान माझा व्हिडीओ पाहिल्याचं म्हणाले. भाषणाबद्दलही त्यांनी भाष्य केलं.