ट्रम्प यांनी सोशल मीडिया ट्रुथ सोशलवर पोस्ट करत लिहिलं, "आताच आमचे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर खूप छान चर्चा झाली. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते खूप छान काम करत आहेत. नरेंद्र, रशिया-युक्रेन युद्ध समाप्त करण्यासाठी तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद."
मोदी–ट्रम्प संभाषणातील 3 मोठ्या गोष्टी
1. वाढदिवसाच्या शुभेच्छा
17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्याने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. 17 जूननंतर प्रथमच दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. त्यानंतर भारत–अमेरिका संबंधांमध्ये तणाव दिसत होता. अशा पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हा फोन महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी मोदींशी केलेली चर्चा खूप चांगली झाल्याचंही सांगितलं.
advertisement
2. रशिया–युक्रेन युद्ध
रशिया–युक्रेन युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प प्रयत्नशील आहेत. त्यांना माहिती आहे की भारताशिवाय हे शक्य नाही, कारण भारत आणि रशिया यांच्यात घट्ट मैत्री आहे. अमेरिकेच्या दबावातही भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही. त्यामुळे या फोन कॉलमध्ये युक्रेनचा मुद्दा ठळकपणे पुढे आला. ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याच्या प्रयत्नात भारताच्या भूमिकेबद्दल मोदींचे आभार मानले.
3. भारत–अमेरिका संबंध
टॅरिफच्या मुद्द्यामुळे मागील काही महिन्यांत भारत–अमेरिका नात्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या या संभाषणातून दोन्ही देशांतील नातेसंबंधांवरील बर्फ वितळताना दिसला. ट्रम्प यांनी मोदींना पुन्हा आपला 'मित्र' म्हटले, तर मोदींनीही त्या भावनेला प्रतिसाद दिला. याआधीही ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या सांगितले होते की ते नेहमीच नरेंद्र मोदींचे मित्र राहतील आणि भारत–अमेरिका यांच्यात विशेष नाते आहे.