विरोधकांवर निशाणा साधत मोदी म्हणाले की, हे दुर्दैवी आहे की देशाच्या शूरवीरांच्या पराक्रमाला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही. मोदींनी स्पष्ट केले की, जगातील कोणत्याही देशाच्या नेत्याने ऑपरेशन थांबवण्यासाठी भारताला सांगितले नाही.
याच दरम्यान 9 मेच्या रात्री अमेरिकेचे उपराष्ट्रपती माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. पण मी सैन्याच्या बैठकीत व्यस्त असल्यामुळे फोन घेतला नाही. नंतर जेव्हा मी फोन घेतला तेव्हा मी विचारले की, तुम्ही 3-4 वेळा फोन का केला? यावर उपराष्ट्रपती म्हणाले की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. यावर मोदींनी उत्तर दिले, जर पाकिस्तानचा हा इरादा असेल तर त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल.
advertisement
पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या त्या विधानालाही उत्तर दिले, ज्यात राहुल गांधी म्हणाले होते की, जेव्हा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्वतः फोन करून पाकिस्तानला माहिती दिली, तर मग आमचे सैन्य लढायला कसे गेले? यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही पहिल्या दिवसापासून स्पष्ट केले होते की आमचे लक्ष्य होते दहशतवादी, दहशतवाद्यांचे आका, त्यांचे सहाय्यक आणि त्यांचे तळ. आम्हाला त्यांना नष्ट करायचे होते आणि आम्ही आमचे काम पूर्ण केले."
"6 आणि 7 मे रोजी ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर लगेचच भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लष्कराला काही मिनिटांत कळवले की, आमचे लक्ष्य काय होते आणि ते आम्ही पूर्ण केले आहे. यामुळे त्यांनाही आणि आपल्यालाही समजेल की त्यांच्या मनात काय सुरू आहे.
या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, भारताच्या सैन्याने प्रथम दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली आणि त्यानंतर पाकिस्तानला याबाबत माहिती दिली.
निर्दोषांच्या हत्येवरही राजकारण
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने पहलगाममधील निर्दोष लोकांच्या हत्येतही राजकारण शोधले. ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह उभे करून तुम्ही मिडियात हेडलाइन बनवू शकता, पण देशवासीयांच्या हृदयात स्थान मिळवू शकत नाही.
पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला बळ देणाऱ्या विरोधकांवरही मोदींनी घणाघाती टीका केली. काही लोक पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला पुढे नेण्यासाठी झटत आहेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
