TRENDING:

नवी दिल्लीत काहीतरी मोठं घडतंय,आधी PM मोदी नंतर अमित शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 5 ऑगस्टला देशात काय होणार?

Last Updated:

PM Modi Shah Meet Murmu: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी काही तासांच्या अंतराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतल्याने दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. संसद सत्र सुरू असताना ही दोन स्वतंत्र भेटी अनेक शक्यतांना वाव देत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच, बिहार SIR प्रकरणावरून संसदेत मोठा गोंधळ चालू आहे. मात्र या सगळ्यादरम्यान रविवारी सकाळी दिल्लीतल्या सत्ताकेंद्रात एक अशी गोष्ट घडली ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना भेटले. त्या भेटीनंतर अवघ्या चार तासांतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील राष्ट्रपती भवनात पोहोचले. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत की, सत्तेतील हे दोन प्रमुख नेते राष्ट्रपतींना वेगवेगळ्या वेळेस भेटण्यामागे कारण काय असावे?

सामान्यतः अशा भेटी औपचारिक असतात किंवा काही विशिष्ट कार्यक्रमाच्या निमित्ताने होतात. मात्र एकाच दिवशी काही तासांच्या अंतराने या दोघांनी राष्ट्रपतींना भेटल्यामुळे या भेटी अत्यंत असामान्य मानल्या जात आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, सरकार काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असू शकते. कदाचित संसदेत काही महत्त्वाचे विधेयक मांडले जाणार असावे. उपराष्ट्रपती पदावरील जगदीप धनखड यांच्या अचानक झालेल्या निरोपाबाबतही काही चर्चा असू शकते. सरकारकडून अद्याप अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण काहीतरी मोठे घडत असल्याचे स्पष्ट दिसते.

advertisement

काय असू शकतात या भेटींचे अर्थ?

1. मोठा राजकीय किंवा घटनात्मक निर्णय?

संकेत असे आहेत की सरकार एखाद्या मोठ्या घटनात्मक किंवा राजकीय निर्णयाच्या विचारात आहे. त्यात एखादी महत्त्वाची नेमणूक असू शकते किंवा राष्ट्रपतींशी संबंधित निर्णय असू शकतो. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागेसाठी निवडणुकीची तयारीही यामागे असू शकते.

2. काश्मीर किंवा ईशान्य भारतातील सुरक्षा विषयक अपडेट?

advertisement

अलीकडेच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा ऑपरेशन्स तीव्र झाले आहेत. लष्कर दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यात व्यग्र आहे. त्याचबरोबर ईशान्य भारतात बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीवर गृह मंत्रालय सतर्क आहे. यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राष्ट्रपतींना वेगवेगळ्या सुरक्षाविषयक घडामोडींबाबत माहिती दिली असण्याची शक्यता आहे.

3. संसदेत मांडले जाणारे विधेयक किंवा अध्यादेश?

संसदेत गदारोळ सुरू असतानाही काही अत्यंत संवेदनशील विधेयके येण्याची शक्यता आहे. त्यात 'कॉमन सिव्हिल कोड (UCC)' आणि 'वन नेशन वन इलेक्शन' यासारख्या महत्त्वाच्या प्रस्तावांचा समावेश आहे. राष्ट्रपतींची पूर्वमान्यता किंवा माहिती आवश्यक असल्याने अमित शहा यांनी राष्ट्रपतींना भेट दिली असावी.

advertisement

संसद अधिवेशन सुरू असतानाची ही भेट महत्त्वाची का?

संसद अधिवेशन सुरू असताना सरकारशी संबंधित वरिष्ठ नेत्यांची राष्ट्रपतींशी भेट सामान्यतः टाळली जाते, जोपर्यंत त्यामागे ठोस कारण नसेल. अशा वेळी पंतप्रधान मोदींची भेट आणि अवघ्या काही तासांनी गृहमंत्री शाह यांची राष्ट्रपती भवनातील हजेरी एखाद्या गंभीर राजकीय हालचालीकडे संकेत देत आहे.

सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे – संसद ठप्प आहे, तरी पंतप्रधान आधी, चार तासांनी अमित शहा… राष्ट्रपतींची भेट! लोक विचारत आहेत – अखेर 5 ऑगस्टला काय होणार आहे?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

काहींनी उपराष्ट्रपती निवडणूक, SIR कारवाई किंवा संसदेत येणाऱ्या संवेदनशील विधेयकांची शक्यता बोलून दाखवली आहे.

मराठी बातम्या/देश/
नवी दिल्लीत काहीतरी मोठं घडतंय,आधी PM मोदी नंतर अमित शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 5 ऑगस्टला देशात काय होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल