काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी -
विरोधक काय करत आहे, आता तुम्ही सांगा काय करणार आहात मोदी, हे असे प्रश्न विचारत आहे, आता हे मीच सांगायचं का? निवडणुकीत जनतेत जाऊन बोलणार आहे. पण विरोधकांचं दु:ख हे आहे की, त्यांच्या राजकीय बुद्धीचE विचार करा की, अनेक अनुभव नसलेल्या गोष्टी ऐकायला मिळत नाही. त्यामुळे ते इतके वर्ष झोपलेले होते.
advertisement
काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसकडे ना निती आहे, ना व्हिजन आहे, ना आंतरराष्ट्रीय बाजू समजण्याचा अधिकार आहे. ना देशाच्या ताकदीचा माहिती आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये भारत आणखी गरीब होत गेला. 1991 मध्ये देश डबघाईला येण्याची स्थिती होती. पण 2014 नंतर भारताने टॉप 5 मध्ये जागा बनवली आहे. काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल हे जादूने झालं असेल. पण देशाचा विश्वास आहे, 2028 मध्ये अविश्वास प्रस्ताव घेऊन या, तेव्हा देश पहिल्या 3 मध्ये असेल, अशा शब्दात भविष्यवाणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना ओपन चॅलेंज दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मेक इन इंडियाची यांनी खिल्ली उडवली. काँग्रेसच्या लोकांचा इतिहास वेगळा राहिला आहे. त्यांचा कधीच विश्वास राहिला नाही. हे विश्वास कुणावर ठेवायचे, पाकिस्तान सीमावर हल्ले करत होता, दहशतवाद्यांना आपल्याकडे पाठवलं जात होतं, ते जबाबदारी घ्यायला तयार नव्हते, पण हे लगेच विश्वास ठेऊन घ्यायचे. त्यांना पाकिस्तानाच्या बोलण्यावर विश्वास होता. काश्मिर दहशतवादाच्या अग्निकुंडात धुमसत होता. भारताने, दहशतवाद्याने सर्जिकल स्ट्राईक केला. भारताने एअर स्ट्राईक केला, पण यांना भारतीय सैन्यावर विश्वास नव्हता, तर शत्रूंच्या दाव्यांवर विश्वास होता. जगात देशाबद्दल कुणी काही बोललं की, ते लगेच लोह-चुंबकासारखं लगेच ओढून घेतात. लगेच देशात प्रचार करतात.
कोरोनामध्ये भारताने आपली लस तयार केली, त्यांना विदेशी लशीवर विश्वास होता. देशातील कोट्यवधी लोकांनी लशीवर विश्वास ठेवला. लोकांच्या सामर्थ्यावर विश्वास नाहीये. भारतील लोकांचा अविश्वास प्रस्तावाबद्दल वाईट बोलले आहे. तामिळनाडूमध्ये शेवटचा काँग्रेसचा विजय झाला होता, ते लोक विश्वास दाखवत नाही. पश्चिम बंगालमध्ये लोक काँग्रेस नको म्हणत आहेत. तसेच उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील लोक म्हणाले, काँग्रेस आता नको. त्रिपुरामध्ये लोक काय म्हणाले नो काँग्रेस.
दीड ते 2 महिन्यांपूर्वी तुम्ही यूपीएचं अंतिम संस्कार केला आहे. लोकशाही नुसार तेव्हाच मला संवेदना व्यक्त करायला होत्या. पण उशीर करण्यात माझा दोष नाही. कारण तुम्ही स्वत: एक आणखी यूपीएचं अंत्यसंस्कार करत होते आणि दुसरीकडे जल्लोषही करत होते. पण जुन्या भंगार गाडीला, इलेक्ट्रिक गाडी असल्याचं सांगत आहात, जुन्या पडिक जागेवर नवं घर सांगत आहात. मला आश्चर्य वाटतं, असं गठबंधन घेऊन लोकांमध्ये जात आहात. त्यांना संस्काराची कोणतीही गोष्ट यांना माहिती नाही. पिढी दर पिढी लाल मिरची आणि हिरवी मिरचीमध्ये यांना काहीच फरक समजत नाही, असा टोला मोदींनी लगावला.