काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विकसीत भारताच्या संकल्पाला आपल्या अभिभाषणात विस्ताराने सांगितलं. महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले आहेत. आम्हा सर्वांचे आणि देशाचे मार्गदर्शन केलं. यासाठी मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मनापासून आभार मानतो.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अनेकांनी विचार मांडले. विशेषत: पहिल्यांदा खासदार होऊन आलेल्या काही सहकाऱ्यांनी जे विचार मांडले. संसदेच्या सर्व नियमांचे पालन करत विचार मांडले. त्यांचं वर्तन एका अनुभवी खासदारासारखं होतं. त्यामुळे पहिल्यांदा इथं येऊनही त्यांनी संसदेची प्रतिष्ठा वाढवली आणि आपल्या विचारांनी या चर्चेला आणखी मौल्यवान बनवलं.
advertisement
देशाने एका यशस्वी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यातून जगाला दाखवून दिलं की ही जगातली सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती. देशाच्या जनतेने जगातील सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेत आम्हाला जनतेने निवडून दिलं आणि मी काही लोकांचा त्रास समजू शकतो. जे सातत्याने खोटं बोलूनही त्यांचा मोठा पराभव झाला, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला.