प्राथमिक माहितीनुसार दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची सूचना अधिकाऱ्यांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) तसेच इतर आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या.
स्थानिक लोकांनी अनेक व्यक्तींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले तर अग्निशमन दलाच्या पथकांनी आणखी तीन लोकांना वाचवले. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. सध्या तरी ढिगाऱ्याखाली कोणीही अडकले नसल्याचे मानले जात आहे. परंतु घटनास्थळाची सखोल पाहणी सुरू आहे. बचाव पथके अद्यापही तेथे उपस्थित असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहेत. मात्र PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आठ ते नऊ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
हुमायूनचा मकबरा हे १६व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण स्मारक आहे. हे स्मारक पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या स्मारकाचे सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे या घटनेची चर्चा देशभरात सुरू आहे.