रेवण्णावर बलात्काराचे आरोप
एका 48 वर्षीय महिलेने रेवण्णावर दोन वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला होता. पीडित महिला ही प्रज्वल रेवण्णाच्या कुटुंबाच्या हासन जिल्ह्यातील गन्नीकाडा येथील फार्महाऊसमध्ये घरगुती कामगार म्हणून कार्यरत होती. पीडितेने आरोप केला होता की, रेवण्णाने 2021 मध्ये आधी फार्महाऊसवर आणि नंतर बंगळूरु येथील घरी तिच्यावर बलात्कार केला. यासोबतच, रेवण्णाने या घटनेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग आपल्या फोनमध्ये केलं असल्याचाही आरोप महिलेने केला होता.
advertisement
माझा एकच गुन्हा आहे की... - रेवण्णा
शुक्रवारी न्यायालयाने प्रज्वल रेवण्णाला दोषी ठरवलं होतं, तर शनिवारी शिक्षेची सुनावणी झाली. शिक्षेच्या वेळी रेवण्णाने न्यायालयाकडे कमी शिक्षा देण्याची विनंती केली. "माझा एकच गुन्हा आहे की मी राजकारणात लवकर वर पोहोचलो.", असं रेवण्णा म्हणाला. खरं तर रेवण्णा याचे तब्बल 2000 अश्लील व्हिडीओ समोर आले होते. तर अनेकांनी समोर येऊल लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.
1632 पानांचे आरोपपत्र दाखल
दरम्यान, या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाने (SIT) केला होता. एसआयटीने 1632 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते, ज्यात 113 साक्षीदार आणि 180 कागदपत्रांचा समावेश होता. पीडितेचे कपडे, डीएनए रिपोर्ट आणि खुद्द आरोपीने बनवलेला व्हिडीओ हे प्रमुख पुरावे म्हणून सादर करण्यात आले होते.
