आजोबा पंतप्रधान, काका मुख्यमंत्री आयुष्यभर तुरुंगात राहणाऱ्या प्रज्जवल रेवण्णाच्या तिजोरीत किती संपत्ती?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
प्रज्जवल रेवण्णाच्या संपत्तीत पाच वर्षात तब्बल चारपटीने वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि कर्नाटकातील हासन मतदारसंघाचे माजी खासदार प्रज्ज्वल रेवन्नाला कोर्टाने मोलकरणीवरील बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला सेक्स टेप प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.
आजोबा पंतप्रधान, काका मुख्यमंत्र, वडील मंत्री अशी राजकारणी पार्श्वभूमी प्रज्ज्वल रेवण्णाची आहे. प्रज्जवल रेवण्णाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीअगोदर जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती 40.45 रुपये एवढी संपत्ती दाखवली आहे. 2019 मध्ये जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे प्रज्जवल रेवण्णाच्या संपत्तीत तब्बल चारपटीने वाढ झाली आहे.
advertisement
प्रज्जवल रेवण्णाची संपत्ती किती?
34 वर्षी माजी खासदार प्रज्जवल रेवण्णाकडे 5.45 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे ज्यामध्ये ठेवी, गुंतवणूक, इतरांना दिलेली कर्जे आणि दागिने यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे 35.84 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी त्यांची एकूण मालमत्ता 9.78 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल याच्यावर 4.49 कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि 3.04 कोटी रुपयांची सरकारी थकबाकी आहे.
advertisement
चौकशीत काय काय समोर आले?
प्रज्ज्वलविरुद्ध पहिला गुन्हा 28 एप्रिल 2024 रोजी नोंदवण्यात आला. तक्रारदार महिला ही घरकामाला होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, प्रज्ज्वलने तिच्यावर एकदा नाही तर दोनदा बलात्कार केला. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे घटनेच्या वेळी पीडितेने नेसलेली साडी तपासात त्या साडीवर शुक्राणूंचे (स्पर्म) डाग आढळले आहेत. जे फॉरेन्सिक तपासणीतही रेवन्नाचे असल्याचं निष्पन्न झालं आहे. तीन वेगवेगळ्या महिलांनी प्रज्वल रेवण्णावर बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. एका 44 वर्षीय महिलेने मे 2024 मध्ये त्याच्याविरुद्ध वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तिसरा गुन्हा 60 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून एसआयटीने नोंदवला होता. 2500 हून अधिक अश्लील व्हिडिओंची चौकशी एसआयटीला एक पेन ड्राइव्ह सापडला आहे, ज्यामध्ये प्रज्वलशी संबंधित सुमारे 2500 अश्लील व्हिडिओ क्लिप आढळल्या आहेत. यामध्ये तो अनेक महिलांवर अत्याचार करताना दिसत आहेत, ज्यांची ओळख उघड होण्याचा धोका आहे. एसआयटीने हे व्हिडिओ इंटरनेटवरून त्वरित काढून टाकण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2025 7:31 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
आजोबा पंतप्रधान, काका मुख्यमंत्री आयुष्यभर तुरुंगात राहणाऱ्या प्रज्जवल रेवण्णाच्या तिजोरीत किती संपत्ती?


