एक्स (X) वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी सांगितले की- राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्धाशी संबंधित अलीकडील घडामोडींवर आपले विचार मांडले. या संदर्भात शक्य ते सर्व सहकार्य देण्याची भारताची कटिबद्धता मोदींनी पुन्हा व्यक्त केली.
दोन्ही नेत्यांनी भारत-युक्रेन द्विपक्षीय भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला आणि परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी बोलून आनंद झाला आणि अलीकडील घडामोडींवर त्यांचे विचार ऐकले. संघर्षाच्या लवकर आणि शांततापूर्ण निराकरणाच्या गरजेबाबत भारताची सातत्यपूर्ण भूमिका मी पुन्हा सांगितली. या संदर्भात शक्य ते सर्व योगदान देण्यास आणि युक्रेनसोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यास भारत कटिबद्ध आहे, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
advertisement
संवादादरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींना युक्रेनियन शहरे आणि गावांवर रशियन हल्ल्यांची माहिती दिली. त्यांनी काल झापोरिझ्झियामधील बस स्थानकावरील हल्ल्याचाही उल्लेख केला. जिथे रशियन सैन्याने जाणूनबुजून केलेल्या बॉम्ब हल्ल्यात डझनभर लोक जखमी झाले.
