लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस आणि इंडिया आघाडीने संविधान धोक्यात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्याचा त्यांना फायदासुद्दा मिळाला. पण त्यानंतर विधानसभा निवडणुकींमध्ये काँग्रेसला फारसं य़श मिळालं नाही. तरीही राहुल गांधी यांच्याकडून संविधानाचा मुद्दा उचलून धरला जात आहे.
लोकसभेत पहिल्या दिवशी प्रियांका गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन शपथ घेतल्याने त्यासुद्धा भाऊ राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचं दिसून आलंय. काँग्रेसकडून संविधानाचा मुद्दा आणखी उचलून धरला जाईल असाच इशारा त्यांनी दिला आहे.
advertisement
शपथ घेतल्यानंतर प्रियांका गांधी त्यांच्या जागेकडे जात असताना राहुल गांधी यांना नमस्कार केला. पुन्हा बहीण भावाने हात जोडून एकमेकांना नमस्कार केला. प्रियांका गांधी यांच्यासोबत खासदार रविंद्र चव्हाण यांनी शपथ घेतली. रविंद्र चव्हाण हे महाराष्ट्रातल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत विजयी झाले.
प्रियांका गांधी या गांधी-नेहरू घराण्यातील नववी व्यक्ती आहेत ज्या संसदेत पोहोचल्या आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, मनेका गांधी, वरुण गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यानंतर आता प्रियांका गांधी यांचीही एन्ट्री झालीय. सध्या गांधी कुटुंबातील तीन सदस्य खासदार आहेत. सोनिया गांधी राज्यसभेच्या खासदार तर राहुल गांधी हे रायबरेलीतून खासदार आहेत.