मुंबई: काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी मतचोरीचा आरोप करताना हरियाणा विधानसभा निवडणूक प्रक्रियेत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. यावेळी राहुल गांधी यांनी एका ब्राझिलीयन मॉडेलचा फोटो दाखवत २२ वेळा मतदान केल्याचा आरोप केला. ब्राझीलची नागरीक असणाऱ्या मॉडेलने हरियाणात मतदान कसे केले यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आला. राहुल गांधी यांच्या या मिस्ट्री गर्लमुळे चांगलीच खळबळ उडाली. आता तिचा व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
मतदार यादी घोटाळ्यासंदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला, तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. भारतापासून हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्या या मॉडेलचे नाव लारिसा आहे. आपला भारतीय राजकारणाशी काहीही संबंध नसून कोणीतरी स्टॉक इमेजवरून तिचा फोटो खरेदी केला आणि त्याचा गैरवापर केला असल्याचे तिने म्हटले.
लारिसा ही मॉडेलिंग करायची, पण आता ती या व्यवसायात नाही. मात्र, ती इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. या घटनेनंतर तिला अनेक भारतीय पत्रकारांकडून मेसेज मिळाले असल्याचे तिने सांगितले. लारिसाने लॅटिन भाषेत आपला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.
काय म्हणाली लारिसा?
लारिसाने म्हटले की, "नमस्कार इंडिया, मला भारतीय पत्रकारांसाठी एक व्हिडिओ बनवण्यास सांगण्यात आले होते. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे. माझा भारतीय राजकारणाशी काहीही संबंध नाही. मी कधीही भारतात गेले नाही. मी एक ब्राझिलियन मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर होती.
लारिसाने आपल्या व्हिडीओत पुढे म्हटले की हे संपूर्ण प्रकरण खूप गंभीर झाले आहे. काही भारतीय पत्रकार माझ्याकडून माहिती मागत आहेत. काही भारतीय पत्रकार मला शोधत आहेत आणि माझी मुलाखत घेऊ इच्छितात. मीच ती मिस्ट्री गर्ल मॉडेल आहे. मी आता मॉडेल नाही. फक्त मुलांची काळजी घेत असल्याचे तिने सांगितले.
तिने पुढे म्हटले की, तुम्हाला वाटते की मी भारतीय दिसते, पण मेक्सिकन दिसते असे मला वाटते असे लारिसाने म्हटले. अनेकांनी मला काही वृत्तपत्रांची कात्रणे पाठवली. काहींनी त्याच्यासोबत भाषांतरे ही पाठवली. याबद्दल मी आभारी असल्याचे लारिसाने म्हटले.
राहुल गांधी यांंनी काय आरोप केले होते?
राहुल गांधींनी केलेल्या दाव्यानुसार गूढ मुलीने हरियाणात २२ वेळा मतदान केलं. त्यांनी स्पष्ट केले की काही मतदान केंद्रांवर एकाच महिलेचा फोटो सीमा, सरस्वती आणि विमला अशा वेगवेगळ्या नावांनी दिसला. त्यांनी सांगितले की त्यांच्या टीमला १० वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर एकच फोटो आणि नाव पाहून आश्चर्य वाटले.
राहुल गांधी म्हणाले की जेव्हा त्यांनी या "गूढ मुलीचा" फोटो त्यांच्या टीमला दाखवला तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. चौकशी केल्यानंतर त्यांना आढळले की तो एका ब्राझिलियन मॉडेलचा स्टॉक फोटो होता.
