काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका गांधी यांचा मुलगा आणि राहुल गांधींचा भाचा रेहान वाड्रा दिसत आहे. राहुल गांधी त्याला नकळत राजकारणाचे धडे देताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी 10 जनपथ निवासस्थानी पेंटिंग कामगारांशी बोलतांना आणि त्यांच्यासोबत रंगकाम करत करताना दिसले.
advertisement
राहुल गांधी हे करत असताना त्याचं महत्त्व रेहानला समजावून सांगत होते. ज्यांच्या हातांनी संपूर्ण भारत उजळला त्यांच्यासोबत एक दिवाळी साजरी करुया असं कॅप्शन व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लवकरच प्रियांका वाड्रा आपल्या मुलाला रेहानला राजकारणात लवकरच आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस समर्थक आणि कार्यकर्ते आणि विरोधक या व्हिडीओकडे रेहानचं राजकारणातलं सॉफ्ट लाँचिंग असल्यासारखं पाहात आहेत. प्रियांका वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवत असताना रेहानचं हे सॉफ्ट लाँचिंग एक चर्चेचा विषय ठरला आहे. रेहान वाड्रा सध्या 24 वर्षांचा आहे. तो एक व्हिज्युअल आर्टिस्ट आहे.