पाटणा, 16 ऑक्टोबर : देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सणासुदीमध्ये लोक सुट्टी घेऊन आपापल्या घरी परततील. यामुळे रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळेल.
दुर्गा पूजा, दिवाळी, छठ पूजा हे सर्व सण लक्षात घेता आणि प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना सुविधा देण्यासाठी रेल्वे योजना करत आहेत. रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी मुजफ्फरपुर-हाजीपुर-पाटलीपुत्र- पं.दीन दयाल उपाध्याय जं.-प्रयागराज- छिवकी या मार्गाने समस्तीपुर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान गाडी क्रमांक-01043 आणि गाडी संख्या-01044 लोकमान्य टिळक-समस्तीपुर-लोकमान्य टिळक सुपरफास्ट पूजा स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पूजा स्पेशल पाटणाच्या पाटलीपुत्र स्टेशनवरही थांबा घेईल.
advertisement
कधीपर्यंत धावणार पूजा स्पेशल ट्रेन -
हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे महत्त्व आहे. त्यामुळे सणासुदीला लोक आपापल्या घरी जातात. यामुळे रेल्वे प्रवासात मोठी गर्दी पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ पूजा लक्षात घेता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी पूजा स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
पूजा स्पेशल ट्रेन ही ट्रेन बिहारच्या समस्तीपुर हून पाटलिपुत्र स्टेशन थांबा घेत मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत 20 ऑक्टोबरपासून 1 डिसेंबर पर्यंत आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी असेल. ही स्पेशल ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसहून 19 ऑक्टोबर पासून 30 नोव्हेंबरपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी असेल.