देवघर, 22 नोव्हेंबर : झारखंडच्या देवघरमध्ये एक किराणा दुकानदार रातोरात करोडपती झाला. आश्चर्य वाटलं ना. तुम्हाला ही बातमी वाचून कदाचित आश्चर्य वाटू शकतं. पण ही बातमी खरी आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान, वर्ल्ड कप फायनलची मॅच. यामध्ये भारताचा पराभव झाला. भारताच्या पराभवानंतर संपूर्ण भारतीय चाहते निराश झाले.
अशा परिस्थतीत एक व्यक्ती असा होता, ज्याच्यासाठी हा दिवस अत्यंत भाग्यशाली ठरला. पुरुषोत्तम असे या व्यक्तीचे नाव आहे. ते झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील सारठ प्रखंडच्या अलुवाडा पंचायतच्या खरवाजोडी गावातील रहिवासी आहेत. त्यांनी ड्रिम 11 मध्ये टीम बनवून दोन कोटी रुपये जिंकले आहेत.
advertisement
पुरुषोत्तम हे गेल्या अनेक दिवसांपासून राशनचे दुकान चालवत आहेत. सोबतच क्रिकेट बॅटिंग अॅप ड्रिम11 वर टीम बनवून आपले नशिब आजमावत होते. चार वर्षांपासून ते प्रयत्न करत होते. शेवटी वर्ल्ड कप फायनलच्या दिवशी त्यांना यश मिळाले.
पुरुषोत्तम यांच्या खात्यात किती पैशे आले -
पुरुषोत्तम यांनी सांगितले की, बालपणापासून त्यांना क्रिकेटची आवड आहे. ते क्रिकेट मॅचला खूप अभ्यासूपणे पाहायचे. याचा त्यांना ड्रिम11 मध्ये फायदा झाला. पुरुषोत्तम हे ड्रिम11 मध्ये 2019च्या आयपीएल स्पर्धेत प्रयत्न करत होते. अनेकदा त्यांना निराशा हाती लागली. शेवटी भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान, खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये त्यांचे नशिब उजळले आणि त्यांना 2 कोटी 44 लाख 32 हजार लोकांमध्ये पहिली रँक मिळाली. आता रक्कम जिंकल्यावर कर कपात होऊन त्यांच्या खात्यात 1 कोटी 40 लाख रुपये आले आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये आता खूप आनंदाचे वातावरण आहे.