मायकेल रुबिन हे पेंटागॉनचे माजी अधिकारी आहेत, ते इराण, तुर्की आणि दक्षिण आशियामध्ये असलेल्या अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ सहकारी देखील आहेत. ते यावेळी बोलताना म्हणाले की धोरात्मकदृष्या कॅनडाच्या तुलनेत भारत अधिक महत्त्वाचा आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरले आहे, यावरून भारत आणि कॅनडाचे संबंध चांगलेच तानले गेले आहेत. यावरून देखील रुबिन यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांवर जोरदार निशाणा साधला आहे.
advertisement
रुबिन यांनी म्हटलं आहे की, निज्जर हा एक दहशतवादी होता. इथे मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करणं चुकीचं आहे. त्याचा अनेक दहशतवादी कारवायामध्ये समावेश होता. असं रुबिन यांनी म्हटलं आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
September 23, 2023 3:06 PM IST
मराठी बातम्या/देश/
कॅनडा आणि भारतामध्ये अमेरिका भारताचीच निवड करेल कारण...; पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याचं मोठं वक्तव्य, ट्रुडोंनाही सुनावलं