TRENDING:

श्रीनगर-लेह महामार्गावर हिमस्खलन, 7 जणांचा बळी; 15 गाड्या बर्फाखाली गाडल्या; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Last Updated:

Avalanche In Ladakh: झोजिला दर्‍यात भीषण हिमस्खलन होऊन 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. बर्फाखाली गाडलेल्या वाहनांमधील लोकांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
श्रीनगर: लडाखमधील श्रीनगर-लेह महामार्गावर झोजिला (Zoji La) दर्‍यात भीषण हिमस्खलन होऊन किमान 7 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दुपारच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सुमारे 15 वाहने अंशतः किंवा पूर्णपणे बर्फाखाली गाडली गेली.
News18
News18
advertisement

ही घटना द्रास परिसरातील ‘कॅप्टन टर्न’ येथे घडली. सुरुवातीला द्रासचे उपविभागीय अधिकारी विशाल अत्री यांनी 5 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली होती, ज्यामध्ये तीन पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश होता. मात्र नंतर मृतांचा आकडा वाढून 7 वर पोहोचला.

घटनेनंतर तातडीने मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलीस, भारतीय लष्कर, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) तसेच सोनमर्ग आणि द्रास जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून बचावमोहीम राबवली जात आहे. ही मोहीम काश्मीरमधील सोनमर्ग बाजूने तसेच लडाखमधील द्रास बाजूने एकाच वेळी सुरू आहे.

advertisement

लडाखचे उपराज्यपाल यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी कारगिलचे डीसी आणि एसएसपी यांना घटनास्थळी भेट देऊन बचावकार्य वेगाने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या असून परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून बर्फाखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

advertisement

मराठी बातम्या/देश/
श्रीनगर-लेह महामार्गावर हिमस्खलन, 7 जणांचा बळी; 15 गाड्या बर्फाखाली गाडल्या; मृतांचा आकडा वाढण्याची भीती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल