TRENDING:

वडिलांनीच मुलीच्या तोंडात ओतले कीटकनाशक; कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल, एका प्रश्नाने उघडकीस आले सत्य

Last Updated:

कर्नाटकातील कलबुर्गी येथे एका वडिलांनी आपल्या 18 वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केली. मुलगी दुसऱ्या समाजातील मुलासोबत प्रेमसंबंधात असल्याने त्यांनी हे कृत्य केले आणि नंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

कलबुर्गी: मुलगी दुसऱ्या समाजातील एका तरुणाच्या प्रेमात पडली म्हणून वडिलांनी तिचा गळा आवळून खून केला आणि नंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वडिलाने मुलीच्या तोंडात कीटकनाशक ओतले जेणेकरून लोकांना तीने आत्महत्या केल्याचे वाटेल. या घटनेची माहिती कलबुर्गीचे पोलीस आयुक्त शरणप्पा एस डी यांनी दिली.

advertisement

ही घटना गुरुवारी (दिनांकानुसार) कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यातील मेलाकुंदा गावात घडली. 18 वर्षीय मुलीची हत्या तिच्या कुटुंबीयांना मान्य नसलेल्या आंतरजातीय संबंधांमुळे करण्यात आली, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. आरोपी शंकरने गुन्हा केल्यानंतरही मुलीच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. गावकऱ्यांना याबद्दल काहीच माहिती नसल्याने त्यांनी तो आत्महत्येचाच प्रकार मानला.

advertisement

सुरुवातीला स्थानिक पोलिसांना मुलीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. पण काही गोष्टींमुळे पोलिसांना संशय आला. जेव्हा पोलिसांनी गावात जाऊन चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांना हा खुनाचा प्रकार असल्याचे पुरावे मिळाले, असे पोलिसांनी सांगितले.

आरोपी शंकरला पाच मुली आहेत. मुलगी आंतरजातीय विवाह करेल तर इतर मुलींच्या लग्नावर परिणाम होईल, अशी त्याला भीती होती. त्यामुळे त्याने तिच्या संबंधांना विरोध केला होता, असे शरणप्पा यांनी सांगितले. शंकरने नातेवाईकांमार्फत मुलीला समजावून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. पण ती ऐकण्यास तयार नव्हती.

advertisement

या प्रकरणात शंकरच्या आणखी दोन नातेवाईकांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या संदर्भात तपास सुरू असून ते दोषी आढळल्यास त्यांनाही अटक केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

मराठी बातम्या/देश/
वडिलांनीच मुलीच्या तोंडात ओतले कीटकनाशक; कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल, एका प्रश्नाने उघडकीस आले सत्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल