राम मंदिराचा हा सोहळा म्हणजे भाजप आणि आरएसएसचा कार्यक्रम आहे, त्यामुळे सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि अधीररंजन चौधरी या राम मंदिराच्या लोकार्पणाला उपस्थित राहणार नाहीत, असं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
'भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिराला राजकीय प्रकल्प बनवलं आहे. अर्धनिर्मित राम मंदिराचा निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून लोकार्पण केलं जात आहे,' असा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी राम मंदिर लोकार्पणाबद्दलची पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 'मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि अधीररंजन चौधरी भाजप आणि आरएसएस आयोजित आमंत्रण स्वीकारत नाही,' असं जयराम रमेश म्हणाले.
advertisement
एक दिवस आधी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही राम मंदिर लोकार्पणाला जाणार नसल्याचं सांगितलं होतं. मला आमंत्रण द्यायला आलेल्यांमध्ये कुणीही ओळखीचं नव्हतं, ओळखीच्या व्यक्तीने आमंत्रण दिलं तरच मी राम मंदिराच्या लोकार्पणाला जाईन, असं अखिलेश यादव म्हणाले.
विश्व हिंदू परिषद हा सोहळा आणखी विशाल करण्यासाठी देशभरातल्या मंदिरांमध्ये भव्य आयोजन करत आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने 22 जानेवारीला सर्व प्रमुख शाळा-कॉलेजना सुट्टी द्यायचा निर्णय घेतला आहे. तसंच हा दिवस ड्राय डेही घोषित करण्यात आला आहे. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करण्याचा नागरिकांचा मानस आहे, यासाठी बाजारांमध्ये शॉपिंगसाठी गर्दी आहे.