TRENDING:

लडाखमध्ये पूर्ण राज्याचं आंदोलन पेटलं, सोनम वांगचूकांविरोधात गृहमंत्रालयाने उचललं मोठं पाऊल

Last Updated:

Ladakh Protests Sonam Wangchuk : लडाखमधील हिंसाचारानंतर केंद्रीय गृह खातं अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. सोनम वांगचूक आता सीबीआय चौकशीत अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लडाखमध्ये पूर्ण राज्याचं आंदोलन पेटलं, सोनम वांगचूकांविरोधात गृहमंत्रालयाने उचललं मोठं पाऊल
लडाखमध्ये पूर्ण राज्याचं आंदोलन पेटलं, सोनम वांगचूकांविरोधात गृहमंत्रालयाने उचललं मोठं पाऊल
advertisement

लेह: लेह-लडाखमध्ये पूर्ण राज्याच्या मागणीसाठी आंदोलन पेटलं आहे. लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर उपोषणावर असलेले शिक्षण तज्ज्ञ, सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी 15 दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलं. तर, दुसरीकडे लडाखमधील हिंसाचारानंतर केंद्रीय गृह खातं अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. सोनम वांगचूक आता सीबीआय चौकशीत अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

advertisement

लेहमध्ये उसळलेल्या युवकांच्या हिंसाचारात भाजपचं कार्यालय पेटवण्यात आलं होतं. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. किमान चार जण ठार झाले आणि 30 हून अधिक लोक जखमी झाले असून पोलिसांच्या गोळीबारात जीवितहानी झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सोनम वांगचूक यांनी आपलं 15 दिवसांचं उपोषण मागे घेतले.

advertisement

सीबीआयच्या रडारवर सोनम वांगचूक...

सोनम वांगचूक यांची संस्थेला परदेशातून मिळणाऱ्या निधीवरून चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे. सोनम वांगचुक यांच्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ आल्टरनेटिव्स, लडाख (HIAL) संस्थेची चौकशी सीबीआयमार्फत सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून परदेशी अंशदान विनियमन अधिनियम (FCRA) चे उल्लंघन झाल्याची तक्रार प्राप्त झाल्याचे समोर आले आहे.

advertisement

सोनम वांगचूक यांनी पीटीआयसोबत बोलताना सांगितले की, दहा दिवसांपूर्वी सीबीआयची टीम HIAL मध्ये आली होती. संस्थेला “बेकायदेशीर परदेशी फंडिंग” मिळाल्याचा आरोप सांगण्यात आला. मात्र, अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून, तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. निधीबाबत बोलताना वांगचूक यांनी सांगितले की, “आम्हाला परदेशी फंडिंगवर अवलंबून राहायचे नाही; आम्ही ज्ञान निर्यात करून महसूल मिळवतो, संयुक्त राष्ट्र, एका विद्यापीठ आणि इटालियन संघटनेशी झालेले तीन सेवा करार परदेशी फंडिंग समजण्यात आले आहे. या करारांवरचा कर सरकारकडे भरला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

advertisement

सीबीआयने वांगचूक यांच्याकडून 2022 ते 2024 या कालावधीतील फंडिंगची कागदपत्रे मागवली आहेत. त्याशिवाय, 2020-21 मधील शाळांशी संबंधित कागदपत्रेही मागितल्याची माहिती त्यांनी दिली. HIAL अंतर्गत शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्ती दिली जाते, असं त्यांनी सांगितलं.

आधी देशद्रोहाचा गुन्हा, संस्थेची जमीन परत घेतली अन्....

सोनम वांगचूक यांनी पुढे म्हटले की, आधी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मग संस्थेला मिळालेली जमीन परत घेण्याचे आदेश दिले, आता सीबीआय व आयकर विभाग चौकशी करत असल्याचे त्यांनी म्हटले. लडाखमध्ये कर लागत नाही, तरीही मी स्वेच्छेने कर भरतो त्यानंतरही नोटिसा मिळत असल्याचा आरोप वांगचूक यांनी केला.

मराठी बातम्या/देश/
लडाखमध्ये पूर्ण राज्याचं आंदोलन पेटलं, सोनम वांगचूकांविरोधात गृहमंत्रालयाने उचललं मोठं पाऊल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल