TRENDING:

30 हजार फूटांवर थरारक क्षण, विमान वेगाने खाली आले; पायलट ठरला देवदूत, वाचवले शेकडो जीव; मोठा अपघात थोडक्यात टळला

Last Updated:

Spicejet Delhi Srinagar Flight: दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानात लँडिंगच्या वेळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना थरारक अनुभव आला. मात्र वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टळला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली/श्रीनगर: शुक्रवारी दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या SG 385 फ्लाइटमधील प्रवाशांनी एक अत्यंत भयावह अनुभव घेतला. लँडिंगच्या अगदी आधी अचानक विमान वेगाने खाली येऊ लागले, केबिनमध्ये जोरदार हादरे बसले आणि अचानक दाब (प्रेशर) खूप कमी झाला. यामुळे प्रवाशांमध्ये आरडाओरडा सुरू झाला आणि काही लोक देवाचे नाव घेऊ लागले. मात्र वैमानिकाच्या प्रसंगावधानमुळे एक मोठा अपघात टळला आणि विमान सुरक्षितपणे श्रीनगर विमानतळावर उतरवण्यात आले. विमानात 200 प्रवासी होते. 

advertisement

विमान धावपट्टीच्या दिशेने जात असताना अचानक केबिनचा दाब कमालीचा कमी झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याचवेळी विमान वेगाने खाली आले. ज्यामुळे लोक घाबरले. केबिन क्रूने तात्काळ प्रवाशांना मास्क घालण्याचे आणि शांत राहण्याचे आवाहन केले, असे एका प्रवाशांनी सांगितले.

advertisement

वैमानिकाचे प्रसंगावधान

एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, केबिनमधील उंची (Cabin Altitude) वाढल्याचा अलार्म वाजताच क्रूने स्टँडर्ड प्रोटोकॉलचे पालन केले. वैमानिकाने लगेच Priority Landing करण्याची विनंती केली आणि विमान सुरक्षितपणे श्रीनगर विमानतळावर उतरवले. सुदैवाने सर्व प्रवासी आणि क्रू सुरक्षित बाहेर आले.

advertisement

प्रवाशांनी सांगितला आतील अनुभव

अचानक बसलेल्या धक्क्यामुळे लोक घाबरले होते. एका प्रवाशाने सांगितले, काही लोक रडू लागले, तर अनेक लोक देवाचे नाव घेऊ लागले. आम्हाला वाटले की आता काहीतरी मोठे घडणार आहे. मात्र क्रू सतत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आश्वासन देत होता.

advertisement

स्पाइसजेटची प्रतिक्रिया

या घटनेनंतर स्पाइसजेटने एक निवेदन जारी केले. 29 ऑगस्ट रोजी दिल्ली-श्रीनगर फ्लाइट SG 385 मध्ये केबिन अल्टीट्यूड वाढल्यामुळे अलार्म वाजला. सर्व आवश्यक पावले उचलली गेली आणि विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या घटनेची माहिती DGCA (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिविल एविएशन) लाही देण्यात आली आहे. सूत्रांनुसार विमानाची तांत्रिक तपासणी अभियांत्रिकी टीम करत आहे आणि अहवाल येईपर्यंत ते ग्राउंडवर ठेवले जाण्याची शक्यता आहे.

हवाई वाहतूक तज्ज्ञांनुसार अशा परिस्थितीत वैमानिकाचा त्वरित निर्णय सर्वात महत्त्वाचा असतो. SG 385 च्या वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत प्राधान्याने लँडिंगची मागणी केली आणि विमान कोणत्याही मोठ्या अपघाताशिवाय सुरक्षितपणे उतरवले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

मराठी बातम्या/देश/
30 हजार फूटांवर थरारक क्षण, विमान वेगाने खाली आले; पायलट ठरला देवदूत, वाचवले शेकडो जीव; मोठा अपघात थोडक्यात टळला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल