दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे केंद्र हरियाणातील झज्जर होते. भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामुळे सुमारे 10 सेकंदांपर्यंत जमीन हादरत राहिली. लोकांनी भीतीने मोकळ्या जागी धाव घेतली.
4.4 magnitude earthquake Delhi NCR
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू झज्जरपासून सुमारे 10 किलोमीटर उत्तरेला होता आणि या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 4.1 इतकी नोंदवण्यात आली आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. मात्र, भूकंपानंतर स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली असून काही ठिकाणी लोक घराबाहेर पडले आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
advertisement
लोकांमध्ये भीतीचे वातावरण...
भूकंपाचे धक्के सुरू झाल्यानंतर घरातील वस्तू थरथरू लागल्या. भूकंपाचे धक्के असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी मोकळ्या जागी आसरा घेतला. तर, काहींनी घरातच टेबल खाली आसरा घेतला. दिल्ली-एनसीआरमध्ये सध्या पाऊस सुरू आहे. अशातच भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.