TRENDING:

तमिळनाडूत सत्तेच्या चाव्या एका व्यक्तीच्या हातात, ओपिनियन पोलचे आकडे पाहून घाम फुटला; मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात?

Last Updated:

Tamil Nadu Opinion Poll: तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर आलेल्या ओपिनियन पोलनुसार राज्यात AIADMK-BJP आघाडी आणि DMK आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात दोन्ही आघाड्यांमधील जागांचा फरक कमी असल्याने सत्ता कोणाच्या हातात जाईल याबाबत उत्सुकता वाढली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चेन्नई: निवडणूक आयोगाने दुपारी तामीळनाडू 2026 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर Matrize-IANS या सर्वेक्षण संस्थेने ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या पोलमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला सत्ता मिळेल याचा अंदाज वर्तवला आहे. पोलनुसार राज्यात सत्ताधारी आणि विरोधी आघाड्यांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
News18
News18
advertisement

या सर्वेनुसार तमिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत आणि बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. ओपिनियन पोलमध्ये AIADMK-BJP आघाडी (AIADMK – BJP+) आणि DMK आघाडी (DMK+) यांच्यात चुरशीची टक्कर होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सर्वेक्षणानुसार AIADMK-BJP+ आघाडीला 114 ते 127 जागा मिळू शकतात. मतांच्या टक्केवारीबाबत बोलायचे झाल्यास या आघाडीला 39 ते 40 टक्के मते मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या आघाडीला बहुमताच्या जवळपास किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असे या सर्वेक्षणातून दिसून येते.

advertisement

दुसरीकडे DMK+ आघाडीला 104 ते 114 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत या आघाडीला 37 ते 38 टक्के मते मिळू शकतात, असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात DMK आघाडीही मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून उभी राहू शकते.

याशिवाय TVK (तमिळगा वेत्री कळघम) या पक्षाला 6 ते 12 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पक्षाला 14 ते 15 टक्के मते मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

advertisement

तसेच इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना मिळून 1 ते 6 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गटाला सुमारे 10 ते 12 टक्के मते मिळू शकतात, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.

Matrize-IANS च्या या ओपिनियन पोलनुसार तमिळनाडूमध्ये AIADMK-BJP आघाडी आणि DMK आघाडी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

तमिळनाडू 60 वर्षांपासून वेगळी राजकीय परंपरा

advertisement

तमिळनाडू मध्ये गेल्या सुमारे 60 वर्षांपासून ना काँग्रेस ना भाजपर स्वतंत्रपणे सत्तेत येऊ शकल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर जवळपास दोन दशकांपर्यंत येथे काँग्रेसची सत्ता होती. मात्र 1967 च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडला.

1967 नंतर तमिळनाडूचे राजकारण प्रामुख्याने DMK आणि AIADMK यांच्या भोवती फिरत आहे. सध्या राज्यात M. K. Stalin यांच्या नेतृत्वाखाली DMK सरकार सत्तेत आहे. 2021 च्या निवडणुकीनंतर हे सरकार स्थापन झाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा नाद खुळा, साडेआठ एकरात आमराई, 80 लाखांची कमाई, संत सावता महाराजांच्या गावचा Video
सर्व पहा

DMK ने काँग्रेस, VCK आणि डाव्या पक्षांसोबत आघाडी केली आहे. तर भाजपने अनेक निवडणुकांमध्ये AIADMK सारख्या पक्षांसोबत आघाडी केली असली तरी राज्यात स्वतःची सत्ता अद्याप मिळवलेली नाही.

मराठी बातम्या/देश/
तमिळनाडूत सत्तेच्या चाव्या एका व्यक्तीच्या हातात, ओपिनियन पोलचे आकडे पाहून घाम फुटला; मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल