जमुई, 13 ऑगस्ट : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 76 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य दिवस केवळ दोन दिवसांवर आहे. त्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी होतील. मात्र यंदाचा हा सोहळा बिहारच्या एका जोडप्यासाठीही खास ठरणार आहे. कारण त्यांना स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांचे खास पाहुणे म्हणून लाल किल्ल्यावर बोलण्यात आलं आहे.
advertisement
पती शत्रुघ्न मांझी आणि पत्नी कपिल देवी असं या दाम्पत्याचं नाव आहे. त्यांना अद्याप या सोहळ्याचं अधिकृत निमंत्रण मिळालेलं नाही, मात्र चार दिवसांपूर्वीच यासंदर्भात माहिती देण्यात आली. बिहारच्या ग्रामीण विकास विभागाने याबाबतचं एक पत्र जारी केलं. त्यामुळे आता या दाम्पत्याने दिल्लीला जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचा आनंद जणू गगनात मावेनासा झाला आहे.
सुनेसाठी सासूच ठरली लाईफ लाईन, किडनी देऊन दिला नवा जन्म, Video
शत्रुघ्न मांझी आणि कपिल देवी बिहारच्या जमुई जिल्ह्यातील इंदपै गावचे रहिवासी आहेत. मरकट्टा गावात बांधलेल्या अमृत सरोवरात दोघं मजूर म्हणून काम करायचे. माती वेचण्यापासून ते चहूबाजूंना झाडं लावण्यापर्यंत या सरोवरासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आजही दोघं भल्या पहाटे सरोवरावर जातात आणि त्या जागेची सफाई करतात. शिवाय गावा-गावात जाऊन केर काढतात. अनेक गावांची साफसफाई केल्यानंतरच ते शेतात जाऊन नेहमीप्रमाणे मजुरी करतात.
एवढी हिम्मत येते कुठून? पगार थकला म्हणून पोलिसांना फोन केला आणि म्हणाला, हॅलो मी...
शत्रुघ्न आणि कपिल देवी यांना 5 मुलं आहेत. दोघं मिळून मुलांचं पालनपोषण करतात. मात्र वर्षभर त्यांना काम मिळतंच असं नाही. वर्षातून अनेकदा अशीही परिस्थिती निर्माण होते, जेव्हा त्यांच्याजवळ काही काम नसतं आणि त्यांच्या जेवणाचे हाल होतात. मात्र तरीही ते सन्मानाने कमवतात आणि सन्मानाने खातात. परंतु हातावर पोट असणाऱ्या या दाम्पत्याला पंतप्रधानांचे खास पाहुणे म्हणून बोलावणं ही विशेष बाब आहे. दोघंही सध्या स्वातंत्र्य दिवस उजाडण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.