सोशल मीडियावर काही वापरकर्त्यांनी TikTokची वेबसाईट उघडल्याचे सांगितले.तर काहींना ती अजूनही ऍक्सेस करता आली नाही. अनेक सबपेजेस अजूनही कार्यरत नाहीत. त्यामुळे भारतात TikTokने अधिकृतरीत्या पुन्हा सुरूवात केलेली नाही असे दिसून येते.
TikTok भारतात का बंद झाले?
जून 2020 मध्ये भारत सरकारने TikTokसह एकूण 59 चिनी अॅप्सना बंदी घातली होती. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले होते की ही अॅप्स भारताची सार्वभौमत्व, अखंडता, भारताचे संरक्षण, राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना हानिकारक आहेत.
advertisement
ही बंदी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय व चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर लादण्यात आली होती. या घटनेनंतर गेल्या अनेक दशकांतील भारत-चीन संबंधांमध्ये मोठी घसरण झाली होती.
पुढे काय?
TikTok हे एकेकाळी भारतात सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या अॅप्सपैकी एक होते. ज्याचे 200 दशलक्षांहून अधिक वापरकर्ते होते. मात्र सध्या तरी TikTokने भारतात पुनरागमनाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अॅप अजूनही बंद आहे. पण थोडक्यात झालेल्या पुनरागमनामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा TikTok परत येईल या आशा जागृत झाल्या आहेत.
