TRENDING:

‘PAN PAN’ कॉल, 236 प्रवासी असलेल्या विमानाच्या इंजिनने आकाशात घेतला पेट, काळजाचा ठोका चुकवणारी घटना, PHOTO

Last Updated:

मुंबई विमानतळावर एअर इंडिया आणि इंडिगो विमानाच्या पंख्यांची धडक झाल्या ची घटना घडून २४ तास उलटले नाही तेच आता हवेतच एका विमानात बिघााड झाल्याची घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोलकाता:  मुंबई विमानतळावर एअर इंडिया आणि इंडिगो विमानाच्या पंख्यांची धडक झाल्या ची घटना घडून २४ तास उलटले नाही तेच आता हवेतच एका विमानात बिघााड झाल्याची घटना समोर आली आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर हे विमान सुरक्षितपणे लँड करण्यात आलं. सुदैवाने विमान हे सुरक्षितपणे कोलकाता विमानतळावर उतरवण्यात आलं. त्यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील काठमांडू विमानतळावरून इस्तंबूलकडे टर्किश एअरलाईन्सचं टीएचव्हाय 727 हे विमान दुपारी १.३८ वाजेच्या सुमारास इस्तंबूलकडे रवाना झाला होतं. विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर पायलटच्या लक्षात आलं की डाव्या इंजिनमध्ये आग लागली आहे. त्यामुळे पायलटने लगेच ‘PAN PAN’ असा कॉल दिला. विमानाला पुन्हा त्याच विमानतळावर लँडिंग करता आलं नाही त्यामुळे कोलकाता विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग करण्याची सूचना देण्यातील.

advertisement

पायलटने १.५१ वाजता याबद्दल कॉल दिला होता त्यानंतर आग आटोक्यात आली अशी माहिती दिली. पण इंजिन हे फेल झालं होतं. त्याामुळे एकाच इंजिनवर विमान सुरू होतं. या विमानात एकूण २३६ प्रवाशी होते. या विमानात आणखी ८ तास प्रवास करू शकेल इतकं इंधन होतं. विमानाला तातडीने कोलकाता विमानतळावर लँड करण्यासाठी सूचना देण्यात आली.

advertisement

अखेर ठरलेल्या वेळेवर २.३१ वाजता विमानाने कोलकाता विमानतळावर इर्मरजन्सी लँडिंग करण्यात आलं. आधीच विमानतळावर अग्निशमन दल आणि रुग्णावाहिका सज्ज करण्यात आल्या होत्या. कोलकाता विमानतळावर रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. विमान लँड झाल्यानंतर तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात आलं. पायलटने प्रसंगावधानपणा दाखवल्यामुळे 236 प्रवाशांची जीव वाचला आहे.

advertisement

PAN-PAN कॉल काय असतो? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AC चं बिल येईल शुन्य रुपये! 3-4 अंशावर रूम होईल गार, किंमत ऐकून बसेल शॉक!
सर्व पहा

विमानामध्ये बिघाड झाल्यानंतर किंवा गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर MayDay कॉल दिला जात असतो. टर्किश एअरलाईन्सच्या पायलटने PAN-PAN कॉल दिला होता. याचा अर्थ असा की, विमानात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पण, विमान सुरक्षित आहे आणि प्रवास करू शकतो, असा या कॉलचा संकेत आहे.

मराठी बातम्या/देश/
‘PAN PAN’ कॉल, 236 प्रवासी असलेल्या विमानाच्या इंजिनने आकाशात घेतला पेट, काळजाचा ठोका चुकवणारी घटना, PHOTO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल