अमित शाह यांनी नुकतीच नेटवर्क 18 च्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी आपला निवृत्तिनंतरचा प्लान सांगितला. शाह यांनी सांगितले की, मी ठरवले आहे की जेव्हा जेव्हा मी निवृत्त होईन तेव्हा मी माझे उर्वरित आयुष्य वेद, उपनिषदे आणि नैसर्गिक शेतीसाठी समर्पित करेन,"
शाह यांनी अनेकदा वाचनाची आवड व्यक्त केली आहे आणि म्हटले आहे की त्यांच्याकडे 8000 पुस्तके आहेत जी वाचण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांना शास्त्रीय संगीताचीही आवड असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
'नेटवर्क 18' च्या सहकार संवाद या कार्यक्रमात ते म्हणाले होते: “माझ्याकडे 8000 पुस्तके आहेत आणि मी एकही वाचलेली नाही. मला शास्त्रीय संगीतात खूप रस आहे, म्हणून मी माझी पुस्तके वाचेन आणि संगीत ऐकेन. अहमदाबादमधील कार्यक्रमात शाह यांनी सेंद्रिय शेतीबाबतही आवड सांगितली. त्यांनी सांगितले की ही एक विज्ञान-आधारित तंत्र आहे ज्याचे प्रचंड फायदे असल्याचे त्यांनी नमूद केले.
रासायनिक खतांसह पिकवलेले गहू विविध आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरते, ज्यामध्ये बीपी (रक्तदाब), मधुमेह, थायरॉईड आणि कर्करोगासारखे आदी जीवघेणे आजार होण्याची दाट शक्यता असते. नैसर्गिक शेती शरीराला रोगमुक्त करण्यास मदत करतेच पण औषधांवरील अवलंबित्व कमी करते, असेही शाह यांनी म्हटले. नैसर्गिक शेतीमुळे शेतीची उत्पादकता वाढते आणि त्यांच्या शेतजमिनीत कृषी उत्पादनात दीड पट वाढ झाल्याचा त्यांचा स्वतःचा अनुभवही त्यांनी सांगितला.
काही महिन्यांपूर्वी, गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा वजन कमी करण्याचा अनुभव शेअर केला होता. योग्य प्रमाणात अन्न आणि पाणी, व्यायाम आणि पुरेशी झोप यासह सकारात्मक सवयींमुळे त्यांच्या आरोग्यात चांगले बदल झाले असल्याचे शाह यांनी सांगितले. जागतिक यकृत दिनानिमित्त बोलताना ते म्हणाले: “मे 2019 पासून आतापर्यंत मी खूप मोठा बदल घडवून आणला आहे. योग्य प्रमाणात झोप, शुद्ध पाणी, अन्न आणि व्यायाम करून मी आयुष्यात बरेच काही साध्य केले आहे. गेल्या साडेचार वर्षांत मी अॅलोपॅथिक औषधांपासून मुक्त झालो असल्याचे शाह यांनी सांगितले.