याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीवेळी गोपाल जोशीने महिलेकडून २ कोटी रुपये घेतले होते. पतीला निवडणुकीत तिकिट देऊ असं आश्वासन दिलं होतं. पण तिकीट दिलं नाही. पैसे परत मागितले तेव्हा अपमान केला. पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक आणि एससीएसटी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेनं दिलेल्या माहितीनुसार गोपाल जोशीने आपला भाऊ केंद्र सरकारमध्ये मोठ्या पदावर असल्याचं सांगितलं होतं.
advertisement
गोपाळ जोशी, त्यांची बहीण विजयालक्ष्मी जोशी आणि गोपाळ यांचा मुलगा अजय जोशी यांच्याविरोधात बसवेश्वरनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री एफआयआर दाखल केला होता. माजी आमदार देवानंद फुलसिंह चव्हाण यांच्या पत्नीने गोपाळ जोशी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, या सर्व प्रकारावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही खुलासा केला आहे. प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, नोव्हेंबर २०१३ मध्ये मी सीटी सिव्हील कोर्ट बंगळुरूत एक गुन्हा दाखल केला होता. त्यात म्हटलं होतं की गोपाल जोशी आणि माझे संबंध २० वर्षांपूर्वीच संपले आहेत. आता ३२ वर्षे झालं आमचा संबंध नाही. माझे फक्त दोन भाऊ आहेत आणि कोणीही बहीण नाही. विजयालक्ष्मी जोशी हिचा माझी बहीण म्हणून उल्लेख पूर्ण चुकीचा आहे.
