TRENDING:

UPSC Chairperson : युपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा, कार्यकाळ संपण्याआधीच घेतला मोठा निर्णय

Last Updated:

UPSC Chairperson Manoj Soni Resigns : डॉक्टर मनोज सोनी हे 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य झाले. तर, 2023 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष डॉक्टर मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ संपण्याला अजून पाच वर्षे शिल्लक असताना दिलेल्या राजीनाम्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला असल्याची माहिती समजते.
News18
News18
advertisement

कोण आहेत वैभव कोकाट? ज्यांनी पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आणलं

डॉक्टर मनोज सोनी हे 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य झाले. तर, 2023 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मनोज सोनी यांनी त्यांचा राजीनामा (UPSC Chairperson Manoj Soni Resigns) महिन्याभरापूर्वीच राष्ट्रपतींकडे दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनोज सोनी यांचा राजीनामा स्वीकारला की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

गेल्या दोन आठवड्यांपासून युपीएससी परीक्षा आणि आरक्षणासाठीच्या प्रमाणपत्रांमुळे महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली आहे. पूजा खेडकर प्रकरणामुळे युपीएससी प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यातच आता मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलंय. यामुळे सोनी यांच्या राजीनाम्याचं या प्रकरणाशी कनेक्शन आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. पण वाद निर्माण होण्याआधीच त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समजते.

advertisement

मराठी बातम्या/देश/
UPSC Chairperson : युपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा, कार्यकाळ संपण्याआधीच घेतला मोठा निर्णय
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल