पानिपत ही युद्ध नव्हे पावन भूमी आहे. तेव्हा जर मराठ्यांच्या मदतीला देशातील अन्य राजे आले असते तर अब्दालीचा पराभव झाला असता. तेव्हा अब्दाला जिंकला असला तरी मनाने असा पराभूत झाला की पुन्हा भारताकडे आला नाही. पण मला असे वाटते की तेव्हा ही आपण एक असतो तर सेफ असतो. पानिपत युद्धात आपण एक नव्हतो त्यामुळे सेफ राहिले नाही. त्यामुळेच आपल्यावर अनेकांनी राज्य केले असे फडणवीस म्हणाले.
advertisement
बजेटसाठी थेट मोदींनी घेतली बैठक, करदात्यांना मिळणार गिफ्ट; स्लॅब होणार मोठे बदल
पानिपतच्या युद्धातून हेच शिकले पाहिजे की- जाती, प्रांत, भाषेचे भेद विसरून एकत्र आले पाहिजे. देशाचा शत्रू कोण हे समजून घेऊन जर एकत्रपणे पुढे गेलो तर पंतप्रधान मोदींनी विकसीत भारताचा जो नारा दिला आहे, ते स्वप्न आपण पूर्ण करू शकू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पानिपत येथे स्मारकासाठी राज्य सरकार पैसे देऊन जागा विकत घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक देखील झाले पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले.