पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत. आरजी कर मेडिकल कॉलेमध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरू आहेत.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत. आरजी कर मेडिकल कॉलेमध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरू आहेत. डॉक्टरांचा संप मिटवण्यातही पश्चिम बंगाल सरकार अपयशी ठरलं आहे. मला मुख्यमंत्रीपदाची लालसा नाही, त्यामुळे मी खूर्ची कधीही सोडू शकते. जनतेचं हित लक्षात घेता मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. बंगालमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली आहे.