TRENDING:

Black Box म्हणजे काय? यामुळे कसं उलगडणार अजित पवारांच्या अपघाताचं कारण?

Last Updated:

हा विमान अपघात होता की घातपात? यासंबंधीत प्रश्नचिन्ह उपस्थीत केले जात आहे. ज्याबद्दल तुम्ही अनेक व्हिडीओ किंवा बातम्या पाहिल्या असतील. पण या अपघाताचं नेमकं कारण ब्लॅक बॉक्समुळेच उलगडू शकतं, असं देखील बोललं जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : विमान प्रवास हा जगातील सर्वात सुरक्षित प्रवासांपैकी एक मानला जातो. कुठेही दुरचा प्रवास कमी वेळेत करायचा असेल तर विमान प्रवास हा सुखाचा आणि वेळ वाचवणारा ठरतो. सुरुवातीला फार कमी लोक किंवा फक्त श्रीमंत लोकच विमानाने प्रवास करत होते, पण आता बहुतांश लोक याने प्रवास करतात. पण मागच्या काही काळात विमान दुर्घटनेच्या काही घटना घडल्याचं समोर आल्या आहेत, ज्यामुळे लोकांनी प्राण गमावले आहे. मागेच जानेवारीमध्ये झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे प्राण गेले आहे.
Black Box
Black Box
advertisement

हा विमान अपघात होता की घातपात? यासंबंधीत प्रश्नचिन्ह उपस्थीत केले जात आहे. ज्याबद्दल तुम्ही अनेक व्हिडीओ किंवा बातम्या पाहिल्या असतील. पण या अपघाताचं नेमकं कारण ब्लॅक बॉक्समुळेच उलगडू शकतं, असं देखील बोललं जात आहे. या प्रकरणात तुम्ही ब्लॅक बॉक्स हा शब्द वारंवार ऐकला असेल, पण ब्लॅक बॉक्स नक्की काय आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थीत झाला आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

advertisement

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

ब्लॅक बॉक्स हे विमानातील एक अत्यंत मजबूत आणि सुरक्षित डेटा रेकॉर्डर उपकरण आहे. तांत्रिक भाषेत याला 'फ्लाईट डेटा रेकॉर्डर' (FDR) आणि 'कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर' (CVR) असे म्हणतात. जरी याचे नाव 'ब्लॅक बॉक्स' असले, तरी याचा रंग गडद नारिंगी (Bright Orange) असतो, जेणेकरून अपघातानंतर ढिगाऱ्यात किंवा जंगलात तो सहज सापडावा.

advertisement

अजित पवारांच्या विमानातील बिघाडाचे कारण ब्लॅक बॉक्स कसे उलगडणार?

जेव्हा विमानाला तांत्रिक समस्या येते, तेव्हा ब्लॅक बॉक्समधील दोन मुख्य भाग तपासावे लागतात:

1. फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR)

हा भाग विमानातील सर्व तांत्रिक माहिती जतन करतो. जसे की:

विमानाचा त्यावेळचा वेग (Speed) किती होता?

विमान किती उंचीवरून (Altitude) उडत होते?

विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता का?

advertisement

इंधनाची स्थिती काय होती?

या सर्व तांत्रिक बाबींच्या आधारे तज्ज्ञ हे ठरवू शकतात की विमानातील कोणता भाग निकामी झाला होता.

2. कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर (CVR)

हा भाग विमानातील वैमानिकांच्या (Pilots) संभाषणाचे रेकॉर्डिंग करतो.

बिघाड जाणवल्यानंतर पायलट एकमेकांशी काय बोलले?

त्यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) काय संदेश दिला?

विमानाच्या कॉकपिटमध्ये कोणते आपत्कालीन अलार्म वाजले होते?

advertisement

या आवाजांच्या विश्लेषणातून अपघाताच्या वेळी मानवी चूक होती की तांत्रिक बिघाड, हे स्पष्ट होते.

ब्लॅक बॉक्स इतका महत्त्वाचा का असतो?

ब्लॅक बॉक्स हा अशा धातूंपासून बनवलेला असतो जो भीषण आग, पाण्याचा प्रचंड दाब आणि मोठ्या धक्क्याला सहन करू शकतो.

हा बॉक्स सुमारे 1,100 अंश सेल्सिअस तापमान एक तासापर्यंत सहन करू शकतो.

जर विमान समुद्रात पडले, तर हा बॉक्स सुमारे 30 दिवसांपर्यंत एक विशेष 'बीकन' सिग्नल पाठवतो, ज्यामुळे शोध पथकाला त्याचे लोकेशन समजते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, हळदीच्या दरात मोठी वाढ, डाळिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

अजित पवार यांच्या विमानाबाबतच्या चौकशीत, ब्लॅक बॉक्समधील डेटा तपासल्यानंतरच हे स्पष्ट होईल की, विमानाचे इंजिन निकामी झाले होते की सेन्सरमध्ये काही बिघाड होता. भविष्यातील हवाई सुरक्षा सुधारण्यासाठी ब्लॅक बॉक्समधील ही माहिती अत्यंत मोलाची ठरते.

मराठी बातम्या/देश/
Black Box म्हणजे काय? यामुळे कसं उलगडणार अजित पवारांच्या अपघाताचं कारण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल