TRENDING:

APMC Market: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, हळदीच्या दरात मोठी वाढ, डाळिंबाला काय मिळाला भाव?

Last Updated:

बुधवार, दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: बुधवार, दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, हळद आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.
advertisement

आल्याच्या दरात सुधारणा

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2760 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 888 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5400 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच रत्नागिरी मार्केटमध्ये आवक झालेल्या 20 क्विंटल आल्यास 6000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, पारा वाढणार, हवामान खात्याचा अलर्ट

advertisement

हळदीची आवक

राज्याच्या मार्केटमध्ये आज 758 क्विंटल हळदीची आवक राहिली. यापैकी हिंगोली बाजारात आवक झालेल्या 500 क्विंटल हळदीस 12500 ते 14600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच सांगली मार्केटमध्ये आवक झालेल्या 64 क्विंटल राजापूरी हळदीस प्रतीनुसार 13100 ते 23000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.

डाळिंबाची आवक कमी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, हळदीच्या दरात मोठी वाढ, डाळिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

आज राज्याच्या मार्केटमध्ये 1538 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी नागपूर बाजारात 687 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2000 ते 6000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 599 क्विंटल डाळिंबास 12000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, हळदीच्या दरात मोठी वाढ, डाळिंबाला काय मिळाला भाव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल