advertisement

वाढवण बंदर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी किती कोटी मिळणार? सरकारकडून दर निश्चित, वाचा गावनिहाय यादी

Last Updated:

Agriculture News : डहाणू तालुक्यातील वाढवण समुद्रकिनारी प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाला गती मिळू लागली असून, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या रेल्वे व रस्ते उभारणीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

Agriculture News
Agriculture News
पालघर : डहाणू तालुक्यातील वाढवण समुद्रकिनारी प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाला गती मिळू लागली असून, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या रेल्वे व रस्ते उभारणीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या भूसंपादनासाठी जमिनींचे दर निश्चित करण्यात आले असून, सूत्रानुसार काही गावांतील बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान अडीच कोटी रुपयांपर्यंत मोबदला मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन
वाढवण बंदर प्रकल्पांतर्गत शेतजमीन, बिगरशेती जमीन तसेच इतर मालमत्तांचे संपादन करण्यात येणार आहे. संबंधित भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार निवाडे तयार करण्यात आले असून, ते मान्यतेसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे सादर करण्यात आले होते. या निवाड्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यानुसार दर जाहीर करण्यात आले आहेत.
१२ गावांसाठी दर निश्चित
पालघर तालुक्यातील नेवाळे, राणी शिगाव, सुमही, गारगाव, चिंचारे, आकेगव्हाण, नानिवली, आंबेदे, आकोली, रावते, शिगाव आणि खुताड या १२ गावांतील भूसंपादित शेतजमिनींसाठी प्रति हेक्टर ६२ लाख ५० हजार रुपये असा मूळ दर निश्चित करण्यात आला आहे. तर या भागातील बिगरशेती जमिनींसाठी प्रति चौरस मीटर ७८० ते २९४० रुपये दर ठरवण्यात आला आहे.
advertisement
डहाणू तालुक्यातील वेगवेगळे दर
डहाणू तालुक्यातील घामटणे, कोल्हाण, घोळ आणि तवा या गावांतील शेतजमिनींसाठीही ६२ लाख ५० हजार रुपये प्रति हेक्टर दर लागू राहणार आहे. वरोर, चिंचणी आणि तणाशी या गावांतील शेतजमिनींसाठी प्रति हेक्टर १ कोटी १६ लाख ४४ हजार १०६ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच बावडे, कोलवली आणि वाणगाव या गावांतील शेतजमिनींसाठी प्रति हेक्टर १ कोटी २२ लाख ४२ हजार ४०८ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. या भागातील बिगरशेती जमिनींसाठी प्रति चौरस मीटर ३३४१ ते ३६६४ रुपये मोबदला देण्यात येणार आहे.
advertisement
जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली बैठक
या संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भूसंपादन निवाड्यांना अंतिम स्वरूप देण्यात आले असून, बाधित खातेदारांना वेळेत मोबदला मिळावा यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मोबदला स्वीकारण्याची प्रक्रिया
भूसंपादनाचा मोबदला स्वीकारण्यासाठी बाधित खातेदारांनी ६० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर जमीन ताब्यात घेऊन मोबदला थेट संबंधित खातेदारांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
advertisement
६० दिवसांनंतर जमीन ताब्यात
निवाडा घोषित झाल्यानंतर ६० दिवस पूर्ण झाल्यावर संबंधित जमिनींचा ताबा शासनाकडून घेतला जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोबदल्याचे सूत्र आणि अंतिम रक्कम
या बंदर प्रकल्पासाठी मोबदल्याचे सूत्र ठरवताना मूळ बाजारदराच्या दुप्पट रक्कम (२ ने गुणाकार), त्यावर गुणांकनानुसार १०० टक्के वाढ आणि २९ ऑगस्ट २०२४ पासून मूळ दरावर १२ टक्के अतिरिक्त घटक (व्याज) देण्यात येणार आहे. याशिवाय, भूसंपादित जमिनीवरील बांधकामे, झाडे, विहीर, बोरवेल आणि इतर मालमत्तेचे मूल्यांकन करून स्वतंत्र नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता, एकूण मोबदला साधारणतः प्रति हेक्टर अडीच कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
वाढवण बंदर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी किती कोटी मिळणार? सरकारकडून दर निश्चित, वाचा गावनिहाय यादी
Next Article
advertisement
Grampanchayat Election: गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' तारखांवर ठेवा लक्ष
गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' त
  • राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे.

  • गावगाड्याचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.

  • येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

View All
advertisement