Shocking : रक्ताचं नातं विसरून भाचा झाला सैतान; मित्राला सोबत घेऊन घरात केलं भयानक कांड; नालासोपारा हादरलं
Last Updated:
Nalasopara crime news : नालासोपारातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे भाच्याने स्वता:च्या अत्यासोबत भयानक प्रकार घडवून आणलेला आहे.
ठाणे : वसईतील नालासोपारा परिसरात एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे. 65 वर्षीय दुर्गा बनसोडे यांची त्यांच्या अल्पवयीन भाच्याने मित्राच्या मदतीने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. माणिकपूर पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
केवळ एका शब्दाचा राग भाच्याने असा काढला
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गा बनसोडे या पश्चिमेकडील बन्हामपूर गावातील भिमाई बंगल्यात एकट्याच राहत होत्या. त्यांची मुलगी बोईसर येथे तर मुलगा वालीव येथे राहत असल्याने त्या एकट्याच होत्या. रविवारी भाचा नेहमीप्रमाणे आत्याला भेटायला आला होता. यावेळी किरकोळ कारणावरून आत्या त्याला ओरडली. त्यातून संतापलेल्या भाच्याने मित्राला बोलावले. आत्या बेसावध असताना त्याने मागून डोक्यावर बांबूने वार केला. यात त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
घटना कधी आली उघडकीस?
सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह घरात आढळून आला. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत तपास सुरु केला आणि तपासामध्ये पोलिसांना हत्येचा संशय हा त्यांच्या 15 वर्षीय भाच्यावर गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांनी सर्व घडलेला प्रकार सांगत गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात धक्कादायक खुलासा
हत्या केल्यानंतर दोघांनी तो मृतदेह बेडमध्ये लपवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला. त्यानंतर ते दोघे पळून गेले. तपासात असेही समोर आले की तीन महिन्यांपूर्वी त्याने आत्याच्या घरात चोरी केली होती. त्यानंतर बनसोडे यांनी सर्व दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. आरोपीने शिक्षण अर्धवट सोडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 8:51 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking : रक्ताचं नातं विसरून भाचा झाला सैतान; मित्राला सोबत घेऊन घरात केलं भयानक कांड; नालासोपारा हादरलं









