Weather Alert In Marathi : कल्याण-डोंबिवलीत वातावरण बदल, उष्णतेचा पारा चढणार, IMD चा अलर्ट
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मुंबईत कमाल तापमानासह किमान तापमानाचा पाराही चढल्याने सकाळी जाणवणारा गारवाही शहरात कमी झाला आहे. यावरून बुधवारी 18 फेब्रुवारी ठाणे जिल्ह्यातील हवामान कसे असेल हे जाणून घेऊया.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामात मोठे बदल होताना दिसतात. पहाटे काही प्रमाणात गारवा जाणवत असला तरी दुपारच्या प्रखर सूर्यप्रकाशामुळे पुढील काही दिवस नागरिकांना उकाड्याचा चांगलाच त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबईत कमाल तापमानासह किमान तापमानाचा पाराही चढल्याने सकाळी जाणवणारा गारवाही शहरात कमी झाला आहे. यावरून बुधवारी 18 फेब्रुवारी ठाणे जिल्ह्यातील हवामान कसे असेल हे जाणून घेऊया.
advertisement
ठाणे जिल्ह्यातील हवामान मुख्यत्वे कोरडे आणि निरभ्र राहण्याची शक्यता आहे. काल पेक्षा आजच्या हवामान किंचित बदल होऊन कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस पूर्ण दिवस हवामान दमट असून दुपारी उन्हाच्या झळा अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवस नागरिकांनी बाहेर पडताना पुरेसे पाणी सोबत ठेवून आणि कॉटन कपड्यांचा वापर करावा.
advertisement
advertisement
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान उष्ण, कोरडे आणि दमट असून , किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस राहील. सकाळी आणि रात्री हलकी थंडी जाणवू शकते, तर दुपारी उष्णतेत वाढ होऊन उन्हाचा कडाका अधिक असेल,नागरिकांनी कडक उन्हामुळे दुपारी बाहेर पडताना कॉटनचे कपडे आणि पुरेसे पाणी सोबत घ्यावे.
advertisement
बदलापूरमधील हवामान उष्ण आणि सूर्यप्रकाशित असेल.कमाल तापमान 35अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असेल. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान उष्ण, कोरडे आणि स्वच्छ राहील. कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. दिवसा कडक उन्हामुळे दुपारी उष्णता जास्त असेल, परंतु रात्री आणि पहाटे हलकी थंडी जाणवेल.








