advertisement

मुंबईच्या हायवेवर BEST बस बनली आगीचा गोळा, थोडक्यात वाचला प्रवाशांचा जीव, VIDEO

Last Updated:

कांदिवलीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील साई धाम मंदिराजवळ बेस्ट सीएनजी बसला आग लागली, प्रवासी सुरक्षित, अग्निशमन दलाने आग विझवली, वाहतूक काही काळ विस्कळीत.

News18
News18
विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई: मुंबईच्या कांदिवली परिसरात मंगळवारी रात्री एका बेस्ट बसला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील साई धाम मंदिराजवळ ही घटना घडली. ही बस सीएनजीवर चालणारी होती अशी माहिती मिळाली आहे. आगीचे स्वरूप पाहता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, मात्र चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
मुंबईतील कांदिवली पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पोईसर मेट्रो स्थानकाजवळून जाणाऱ्या बेस्ट बसला आग लागली. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहे. समता नगर पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत. बचाव कार्य हाती घेण्यात आले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. बेस्ट बस जळून खाक झाली.
advertisement
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री बेस्टची बस पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जात असताना अचानक इंजिनच्या भागातून धूर निघू लागला. कांदिवली पूर्व येथील साई धाम मंदिराजवळ बस येताच आगीने रौद्र रूप धारण केले. ही सीएनजी बस असल्याने मोठा स्फोट होण्याची भीती होती, परंतु आग पसरण्याआधीच सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून खाली उतरवण्यात आले.
advertisement
अग्निशमन दलाची धाव
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक अंदाजानुसार, बसच्या इंजिनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाहतूक विस्कळीत
भररस्त्यात बसला आग लागल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी वाहतूक रोखून धरली होती आणि वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आग पूर्णपणे विझल्यानंतर आणि रस्ता मोकळा केल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईच्या हायवेवर BEST बस बनली आगीचा गोळा, थोडक्यात वाचला प्रवाशांचा जीव, VIDEO
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement