Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, पारा वाढणार, हवामान खात्याचा अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
थंडी आता हळूहळू कमी होत असून, उन्हाळ्याच्या सुरुवातीचे संकेत दिसत आहेत. पावसाची शक्यता बहुतांश भागांत नगण्य आहे. पाहुयात 19 फेब्रुवारीला राज्यात कसं असेल हवामान.
advertisement
कोकण विभागात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. मुंबईत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस आणि किमान 24 ते 26 अंशांच्या आसपास असेल. सकाळी हलका गारवा जाणवू शकतो, पण दुपारनंतर उकाडा वाढेल. आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील. समुद्रकिनाऱ्यावर वाहणाऱ्या समुद्री वाऱ्यांमुळे थोडासा आराम मिळेल, पण आर्द्रता जास्त असल्याने अस्वस्थ वाटेल.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये तापमानात वाढ होईल. पुण्यात कमाल 32 ते 34 अंश आणि किमान 18 ते 20 अंश राहण्याची शक्यता. रात्रीचे तापमान आता 20 अंशांपेक्षा जास्त नोंदवले जात असून, पहाटेची थंडी जवळपास नाहीशी झाली आहे. आकाश निरभ्र राहील, पाऊस नाही. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी पाण्याचे नियोजन करावे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









