advertisement

Neena Gupta: 'सांगायला खूप त्रास होतोय, पण...' प्रेम नाही, तर 'या' कारणामुळे नीना गुप्ता यांनी 50 व्या वर्षी केलं लग्न

Last Updated:
Neena Gupta: कधी काळी 'सिंगल मदर' म्हणून समाजाचे टोमणे सोसणाऱ्या नीनाजींनी वयाच्या ५० व्या वर्षी विवेक मेहरा यांच्याशी लग्नाची गाठ बांधली.
1/10
बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही. त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे नीना गुप्ता.
बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही. त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे नीना गुप्ता.
advertisement
2/10
कधी काळी 'सिंगल मदर' म्हणून समाजाचे टोमणे सोसणाऱ्या नीनाजींनी वयाच्या ५० व्या वर्षी विवेक मेहरा यांच्याशी लग्नाची गाठ बांधली.
कधी काळी 'सिंगल मदर' म्हणून समाजाचे टोमणे सोसणाऱ्या नीनाजींनी वयाच्या ५० व्या वर्षी विवेक मेहरा यांच्याशी लग्नाची गाठ बांधली.
advertisement
3/10
पण हे लग्न प्रेमासाठी होतं की आणखी कशासाठी? नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यामागचं असं काही कारण सांगितलंय, जे ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल.
पण हे लग्न प्रेमासाठी होतं की आणखी कशासाठी? नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यामागचं असं काही कारण सांगितलंय, जे ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल.
advertisement
4/10
शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये नीना गुप्ता यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. जेव्हा त्यांना विचारलं की,
शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये नीना गुप्ता यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. जेव्हा त्यांना विचारलं की, "तुम्ही विवेक मेहरांशी प्रेमापोटी लग्न केलं का?" तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं.
advertisement
5/10
नीना म्हणाल्या,
नीना म्हणाल्या, "बघा, हे प्रेम-बिम मला काही समजत नाही. या जगात मला फक्त माझ्या मुलीवरचं प्रेम समजतं, बाकी कोणत्याही प्रेमावर माझा विश्वास नाही." नीनाजींच्या या उत्तराने तिथे उपस्थित असलेले सर्वच जण अवाक झाले.
advertisement
6/10
लग्नाचं कारण सांगताना नीना गुप्ता यांनी समाजाच्या दुटप्पीपणावर बोट ठेवलं. त्या म्हणाल्या,
लग्नाचं कारण सांगताना नीना गुप्ता यांनी समाजाच्या दुटप्पीपणावर बोट ठेवलं. त्या म्हणाल्या, "मला लग्नाची प्रचंड गरज होती. जर आपल्याला या समाजात राहायचं असेल, तर इथल्या काही नियमांचं पालन करावंच लागतं. हे मी माझ्या आयुष्यातील चुकांमधून शिकलं आहे."
advertisement
7/10
त्या पुढे म्हणाल्या,
त्या पुढे म्हणाल्या, "जेव्हा मी एकटी होते, तेव्हा लोक मला विचित्र नजरेने बघायचे. पण एकदा का तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं की लोकांच्या नजरा बदलतात. सगळं काही अचानक ठीक होऊन जातं. हे सांगायला खूप त्रास होतोय, पण हेच कटू सत्य आहे."
advertisement
8/10
नीना गुप्ता यांचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. ८० च्या दशकात वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्याशी असलेल्या नात्यातून त्यांनी १९८९ मध्ये मसाबा या मुलीला जन्म दिला.

9/10
लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेणं त्या काळात खूप मोठं धाडस होतं. नीनाजींनी कोणाचीही मदत न घेता मसाबाला 'सिंगल मदर' म्हणून वाढवलं.
लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेणं त्या काळात खूप मोठं धाडस होतं. नीनाजींनी कोणाचीही मदत न घेता मसाबाला 'सिंगल मदर' म्हणून वाढवलं.
advertisement
10/10
पण ५० व्या वर्षी पोहोचल्यावर आयुष्यात एक सोबती आणि सामाजिक सुरक्षेची गरज त्यांना भासली, म्हणूनच त्यांनी २००८ मध्ये चार्टर्ड अकाउंटंट विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.
पण ५० व्या वर्षी पोहोचल्यावर आयुष्यात एक सोबती आणि सामाजिक सुरक्षेची गरज त्यांना भासली, म्हणूनच त्यांनी २००८ मध्ये चार्टर्ड अकाउंटंट विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement