Pune: पुण्याच्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, 5 ते 6 वाहनं धडकली, घटनास्थळाचा पहिला VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
अचानक महामार्गावर एकापाठोपाठ ५ ते ६ वाहनांनी एकमेकांना जोराची धडक दिली. या अपघातामुळे महामार्गावर एकच गोंधळ उडाला.
अभिजित पोते, प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील अपघाताचे केंद्रबिंदू असलेल्या नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. पुणे सातारा महामार्गावर ५ ते ६ वाहनांची एकमेकांना धडक दिली. या अपघातात ३ ते ४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. पण, या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सातारा महामार्गावर दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. नवले पुलाच्या जवळच असलेल्या दरी पुलाजवळ ही घटना घडली. अचानक महामार्गावर एकापाठोपाठ ५ ते ६ वाहनांनी एकमेकांना जोराची धडक दिली. या अपघातामुळे महामार्गावर एकच गोंधळ उडाला.
पुणे-सातारा महामार्गावर नवले पुलाजवळ अपघात, घटनास्थळाचा व्हिडीओ pic.twitter.com/bWm5GEVDOH
— News18 Marathi (@News18_marathi) February 18, 2026
advertisement
साताऱ्याकडून नवले पुलाकडे येताना दरी पुलावर या घटनेमुले वाहतूक कोंडी झाली होती. पुलावर रस्त्याच्या बाजूला एकमेकांना धडकलेल्या कार बाजूला उभ्या होत्या. तर एक कार ही महामार्गावरच डिव्हायडरला धडकलेली होती. या अपघातात ३ ते ४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं. अपघातग्रस्त वाहनाला बाजूला करण्यात आलं आहे. पण हा अपघात कशामुळे घडला हे मात्र अद्याप कळू शकलं नाही. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघात ग्रस्त वाहनं बाजूला करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस असून तपास करत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 6:55 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune: पुण्याच्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, 5 ते 6 वाहनं धडकली, घटनास्थळाचा पहिला VIDEO







