Bank Locker Rules : बँकेच्या लॉकरमधून सोनं गायब झालं तर त्यासाठी कारणीभूत कोण? त्याची भरपाई कोण करतं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
प्राथमिक तपासात पोलिसांना कोणतीही तोडफोड आढळली नाही आणि ही अफवा असल्याचे समोर आले असले, तरी या निमित्ताने एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर खरोखरच बँकेच्या लॉकरमधून तुमचे सोने चोरी झाले, तर त्याला जबाबदार कोण?
आपण आपले कष्टाचे पैसे, सोन्या-चांदीचे दागिने आणि महत्त्वाचे दस्तऐवज घरापेक्षा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणे जास्त सुरक्षित मानतो. "बँकेत आहे ना, मग काळजी कशाला?" असा आपला ठाम विश्वास असतो. पण, नुकतीच दिल्लीच्या कीर्ती नगर भागातील पंजाब नॅशनल बँकेत (PNB) घडलेली एक घटना या विश्वासाला तडा देणारी ठरू शकते.
advertisement
एका महिलेने आणि तिच्या सासूने लॉकर उघडले आणि चक्क त्यातले सोने गायब असल्याचा दावा केला. या एका बातमीने संपूर्ण परिसरात आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली. इतर लॉकर धारकही धावतपळत बँकेत पोहोचले. जरी प्राथमिक तपासात पोलिसांना कोणतीही तोडफोड आढळली नाही आणि ही अफवा असल्याचे समोर आले असले, तरी या निमित्ताने एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर खरोखरच बँकेच्या लॉकरमधून तुमचे सोने चोरी झाले, तर त्याला जबाबदार कोण?
advertisement
वाचून धक्का बसेल, पण तांत्रिकदृष्ट्या बँक तुम्हाला लॉकरच्या रूपाने केवळ एक सुरक्षित जागा भाड्याने देते. तुमच्या लॉकरमध्ये नक्की काय आहे, याची माहिती बँकेला नसते आणि कायद्याने ती त्यांना विचारताही येत नाही. त्यामुळे, त्यातील वस्तूंच्या 100% सुरक्षिततेची कायदेशीर जबाबदारी घेण्यास बँका नेहमीच टाळाटाळ करतात.
advertisement
advertisement
भरपाई किती मिळते? ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बँकेकडून मिळणारी भरपाई ही तुमच्या लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट असते.उदाहरण: जर तुमच्या लॉकरचे वार्षिक भाडे 4,000 रुपये असेल, तर तुमच्या लॉकरमध्ये 40 लाखांचे सोने असले तरी बँक तुम्हाला जास्तीत जास्त 4 लाख रुपयेच भरपाई देईल. त्यापेक्षा जास्त नाही.
advertisement
advertisement
तुम्ही काय काळजी घ्यावी? (सुरक्षेसाठी 5 टिप्स)बँक लॉकर सुरक्षित असले तरी ते पूर्णपणे 'रिस्क-फ्री' नाहीत. त्यामुळे खालील गोष्टी नक्की करा:विमा (Insurance) उतरवा: तुमच्या मौल्यवान दागिन्यांसाठी स्वतंत्र विमा उतरवणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. चोरी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी विमा कंपनीकडून पूर्ण भरपाई मिळण्याची शक्यता असते.लॉकरमध्ये काय ठेवले आहे याची लेखी यादी आणि त्यांचे फोटो घरी सुरक्षित ठेवा. खरेदीच्या पावत्याही सांभाळून ठेवा.बँक लॉकर घेताना तुम्ही ज्या करारावर स्वाक्षरी करता, तो नीट वाचा. त्यात बँकेच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे लिहिलेल्या असतात.आपले लॉकर वेळोवेळी उघडून चेक करत राहा.
advertisement










