Karan Kundra: "बिग बॉसच्या इतिहासातला मी सर्वात महागडा स्पर्धक...", करण कुंद्राचा धक्कादायक खुलासा
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
'बिग बॉस'मधला सर्वाधिक महागडा स्पर्धक तो स्वत: असल्याचा खुलासा करण कुंद्राने प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या पॉडकास्टमध्ये केलेला आहे.
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नावांमध्ये करण कुंद्राचं नाव आवर्जुन घेतलं जातं. हिंदी इंडस्ट्रीतील कोणताही रिॲलिटी शो असो, त्यामध्ये त्याचा समावेश असतो. सध्या करण कुंद्रा त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. 'बिग बॉस 15'नंतर करण सोशल मीडियासह सर्वत्र कमालीचा फेमस झाला आहे. करण कुंद्रा 'बिग बॉस 15' शोमध्ये सर्वाधिक महागडा कंटेस्टंट असल्याचा त्याने खुलासा केला आहे. अलीकडेच करणने 'बिग बॉस ओटीटी 2'चा विनर आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव याला दिलेल्या मुलाखतीत हा महत्त्वाचा खुलासा केला आहे. माझ्या एवढी जास्त फी आजपर्यंत बिग बॉसच्या इतिहासात कोणीही घेतलेली नसेल, असा खुलासा त्याने केला आहे.
'बिग बॉस'मधला महागडा स्पर्धक कोण?
एल्विश यादवच्या पॉडकास्टमध्ये करण कुंद्राने शोमधील त्याच्या फी बद्दलचा महत्त्वाचा खुलासा केलेला आहे. त्याने इतकंही सांगितलं की, सर्वाधिक फी मागून मी बिग बॉसच्या इतिहासात माझं नाव कोरलं आहे. एवढी फी कोणत्याही कंटेस्टंटने आजवर मागितलेली नाही. जेव्हा एल्विशने करणला तुझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा चेक कोणता होता, असा प्रश्न विचारला. त्यावर करण म्हणाला की, "माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा चेक हा 'बिग बॉस 15'चा होता. सर्वाधिक मानधन घेणार्यांच्या यादीमध्ये माझं नाव बिग बॉसच्या इतिहासामध्ये कोरले आहे. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, असण्याचा हा एक प्रसंग असावा. बिग बॉसची टीम माझ्यासोबत गेल्या चार-पाच वर्षांपासून बिग बॉसमध्ये येण्याबद्दल बोलत होते आणि तेव्हाच कोविड संपला होता."
advertisement
'बिग बॉस'बद्दल करण काय म्हणाला?
"तेव्हा मेकर्स म्हणत होते की, काहीही होऊद्या आम्हाला यंदाच्या सीझनमध्ये करण कुंद्रा हवा आहे. तर त्यांना मी जरा रागिट माणूस असल्याचं सांगितलं होतं. या कारणामुळे मला तुम्ही शोमध्ये घेऊ नका, असं त्यांना म्हणालो होतो. पण तरीही ते त्यांच्या मुद्द्यावर कायमच होते. आम्हाला चालेल, असं म्हणत त्यांनी मला शोमध्ये येण्याची पुन्हा एकदा मागणी केली. त्यांची विनंती मान्य करत, मी त्यांना हो म्हणालो. जेवढं मानधन तू मागितलंय, तेवढं मानधन आजवर कोणीही मागितलेलं नाही. सर्वात महागडा स्पर्धक आहेस तू, असं बिग बॉसचे मेकर्स आणि टीम मला म्हणाली होती. कारण, त्यावेळी मी कॅमेऱ्याच्या पाठी आणि सह निर्माता म्हणूनही काम करत होतो. त्यामुळे मला माहिती होतं, मानधन किती मागायला हवं." दरम्यान, हा खुलासा फक्त करण कुंद्रानेच केलेला आहे.
advertisement
बिग बॉस 15 मध्ये करण कुंद्रासोबत शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, जय भानुशाली सारखे अनेक टिव्ही कलाकार आणि रिॲलिटी शोमधले कलाकार होते. याच शोच्या माध्यमातून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची लव्हस्टोरी सुरू झाली. बिग बॉस 15 ची ट्रॉफी तेजस्वी प्रकाशने जिंकली होती. तेव्हापासून ते आजवर हे कपल कायमच प्रेक्षकांच्या नजरेत राहिलेले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 8:00 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Karan Kundra: "बिग बॉसच्या इतिहासातला मी सर्वात महागडा स्पर्धक...", करण कुंद्राचा धक्कादायक खुलासा








