advertisement

Ajit Pawar: दादांच्या मुलाच्या मनातही प्रश्नांचं वादळ,धाकट्या लेकाने 20 दिवसांनी मौन सोडलं, अपघातात....

Last Updated:

अजित पवारांच्या धाकट्या लेकाने देखील सोशल मीडिया पोस्ट करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे :  गेल्या चोवीस तासात पुन्हा दोन महत्वाच्या घटना घडल्यात. एक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलीय तर दुसरीकडे रोहित पवारांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत काही मुद्दे उपस्थित केले. आमदार रोहित पवारांनी अजित यांच्या विमान अपघात प्रकरणात मोठे गौप्यस्फोट केले. त्यामुळे अजित पवारांच्या विमान अपघाताचं गूढ अधिकच वाढलं आहे. दरम्यान आता अजित पवारांच्या धाकट्या लेकाने देखील सोशल मीडिया पोस्ट करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
advertisement
रोहित पवारांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन नवे प्रश्न उपस्थत केले. रोहित पवारांच्या प्रश्नांमुळे संशयाचं धुकं जास्त गडद झाल्यानं राजकीय वर्तुळात आणि राज्यात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. रोहित पवार यांनी अपघातानंतर विमानात मोठे स्फोट झाल्याचा दावा केला. विमानात अतिरिक्त इंधनाचा साठा होता आणि त्यामुळेच वारंवार स्फोट झाल्याची शंका त्यांनी उपस्थित केली. ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी मॅनिप्युलेशनचा आरोप केला. आता  जय पवार यांनी विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर ब्लॅक बॉक्स सहज नष्ट होत नाहीत, त्यामुळे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेला या दुर्दैवी घटनेचे खरे कारण समजण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
advertisement

जय पवार यांच्या पोस्टमुळे गूढ वाढलं 

राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, हसन मुश्रीफ, पार्थ पवार यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आलं. दरम्यान रोहित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे विमान कंपनी आणि चौकशीबाबतच संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर आता जय पवार यांच्या पोस्टमुळे गूढ अधिकच वाढलं आहे.
advertisement

काय म्हणाले पार्थ पवार?

विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे. Miss You Dad
advertisement

निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

पोस्टच्या शेवटी “Miss you Dad ” असे भावनिक शब्द लिहित त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जय पवार यांच्या या पोस्टनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar: दादांच्या मुलाच्या मनातही प्रश्नांचं वादळ,धाकट्या लेकाने 20 दिवसांनी मौन सोडलं, अपघातात....
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement