TRENDING:

Bihar News: प्रियकरासोबत बायको पळाली; पठ्ठ्याने लगेच दुसरी आणली; पहिली माघारी आली अन्..

Last Updated:

Bihar News: महिला प्रेमात इतकी आंधळी झाली की पोटच्या पोरांचाही तिला विसर पडला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिहार : मोबाइल गेम्स हे आता केवळ मनोरंजन राहिलेले नाही. या गेम्सचं व्यसन समाजात वाढताना दिसतं. यातून गुन्हेदेखील घडत आहेत. बिहारमध्ये या कारणावरून एक गंभीर घटना उघडकीस आली. एक विवाहित महिला ऑनलाइन ल्युडो पार्टनरच्या प्रेमात पडली आणि पतीला सोडून प्रियकराकडे निघून गेली. इकडे पतीनेदेखील दुसरा विवाह केला. आता ही महिला त्याच्या पतीकडे पोटगी मागत आहे.
News18
News18
advertisement

मोबाइल गेमच्या जाळ्यात अडकून केवळ मुलं चुका करतात असं नाही, तर आता प्रौढ व्यक्तीदेखील याला बळी पडू लागले आहेत. बिहारमधली एक विवाहित आणि दोन मुलांची आई असलेली महिला ऑनलाइन ल्युडो खेळत असताना गेम पार्टनरच्या प्रेमात पडली आणि पतीला सोडून प्रियकराकडे निघून गेली. दुसरीकडे पतीनेदेखील पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह केला. आता प्रियकराकडून परत आलेल्या पत्नीने पतीकडे पोटगी मागितली आहे. पती-पत्नीचं हे विचित्र प्रकरण उघडकीस येताच गावात जोरदार चर्चा सुरू झाली. आता गावातले नागरिकक त्यांच्या स्तरावर हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

advertisement

बिहारच्या भागलपूर जिल्ह्याच्या नवगछिया भागात दोन मुलांची आई असलेली महिला ऑनलाइन ल्युडो गेम खेळत असताना एका युवकाच्या प्रेमात पडली. ती युवकाच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली आणि पतीला सोडून युवकाकडे आली. प्रेमापुढे ती तिच्या मुलांनादेखील विसरली. प्रियकराच्या सांगण्यावरून ती त्याच्या उत्तर प्रदेशातल्या घरी पोहोचली. महिलेच्या पतीने तिला घटस्फोट न देता दुसरा विवाह केला. जेव्हा पहिल्या पत्नीला ही गोष्ट कळाली तेव्हा ती प्रियकराला सोडून थेट सासरी पोहोचली आणि तिने पोटगीची मागणी केली.

advertisement

वाचा - गे डेटिंग ॲपवर भेट, त्याच्या प्रेमात वेडा झाला अन् भेटायला मुंबईतून गेला आणि...

या प्रकरणी पत्नी पूजा कुमारीने सांगितलं, की `माझा विवाह 2017-18मध्ये बलहा इथल्या गौतम कुमारशी झाला. त्याची आई, बहीण आणि भावजय मला पाहू इच्छित नव्हत्या. त्या मला खूप त्रास देत होत्या. ऑनलाइन ल्युडो खेळत असताना मी माझ्या प्रियकराकडे पळून गेले ही माझी चूक आहे. तो यूपीचा असून त्याचं नाव विनोद आहे. माझ्यासोबत घटस्फोट न घेता गौतम कुमारने दुसरा विवाह केला आहे. माझ्या पतीने लपून दुसरा विवाह केला त्यावर माझा आक्षेप नाही. तो मला त्याच्यासोबत राहू देणार असेल तर माझी हरकत नाही; पण जर तो मला त्याच्यासोबत राहू देणार नसेल तर त्याने माझ्यासह मुलांचा खर्च उचलावा, ही माझी मागणी आहे. कारण मला अनेक आजार आहेत, त्यामुळे त्याने दिलेल्या पैशांतून मी माझं पालनपोषण करू शकेन.`

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दुसरीकडे, पती गौतम कुमारने पहिल्या पत्नीला सोबत राहण्यास नकार दिला आहे. तो म्हणाला, की `माझा 2017मध्ये पूजा कुमारीशी विवाह झाला. 2022मध्ये मी घरी नसताना ती घरातून पळून गेली. ही माहिती मिळताच मी तिच्या शोधात सुरतला गेलो; पण ती सापडली नाही. मग मी हैदराबादला मजुरी करायला गेलो. दोन महिन्यांनंतर पत्नी माहेरून परतली. तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी मला कॉल करून तिची चूक झाली असं सांगितलं. हे ऐकून मी पत्नीला माफ केलं; पण पूजा तिच्या ऑनलाइन गेम फ्रेंडसोबत यूपीत राहून परत आली आहे, हे समजल्यावर या महिन्यात 17 तारखेला दुसरा विवाह केला. मी आता पूजा कुमारीला माझ्यासोबत राहू देणार नाही.`

advertisement

मराठी बातम्या/देश/
Bihar News: प्रियकरासोबत बायको पळाली; पठ्ठ्याने लगेच दुसरी आणली; पहिली माघारी आली अन्..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल