महायुद्धापेक्षा साथीच्या रोगात जास्त मृत्यू
यूके व्हॅक्सिन टास्कफोर्सचे अध्यक्ष केट बिंघम यांनी सांगितलं, की अशा महामारीमुळे लाखो जणांचा जीव जातो. पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्यांपेक्षा स्पॅनिश फ्लूमुळे अकाली मरण पावलेल्यांची संख्या दुप्पट आहे. बिंघम म्हणाले, की आज पूर्वीपेक्षा जास्त विषाणू आहेत आणि त्यांचे व्हॅरिएंट्सदेखील खूप लवकर पसरतात. सर्व व्हॅरिएंट्स प्राणघातक नसले तरी त्यामुळे साथ पसरू शकते. आतापर्यंत सुमारे 25 व्हायरस फॅमिलीजची नोंद झाली आहे. शास्त्रज्ञ लवकरच लस तयार करण्यात सक्षम होतील.
advertisement
संसर्गजन्य आजार आहेत आणि त्यामुळे साथ पसरू शकते. यामध्ये एबोला व्हायरस, मारबर्ग, सीव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम, कोविड-19, झिका, मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम इत्यादींसह काही नवीन आजारांचा समावेश आहे.
'एक्स' हा आजार नाही एक शब्द आहे
आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कोरोनापूर्वीही डिसीज एक्स अस्तित्वात होता, ज्याला कोरोना असं नाव देण्यात आलं. एक्स हा शब्द वापरला जातो. कारण रोगाचा शोध लागताच त्याला नाव देता येईल. हा एक प्रकारचा प्लेसहोल्डर आहे ज्याचा वैद्यकीयशास्त्रातल्या अज्ञात रोगांसाठी वापर केला जातो. सध्या, शास्त्रज्ञांना या रोगाचं स्वरूप आणि प्रकार याबद्दल स्पष्ट माहिती नाही.