TRENDING:

मालेगाव बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड 19 वर्षांपासून बेपत्ता, NIA शोधून थकली; संदीप डांगे कुठे आहे?

Last Updated:

Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञा ठाकूरसह सर्व सात आरोपींना निर्दोष ठरवले आहे. मात्र 2006 साली झालेल्या स्फोटात आरोपी असलेला संदीप डांगे अजूनही 19 वर्षांनंतरही फरार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा गुरुवारी निकाल आला. एनआयए (NIA) न्यायालयाने भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सातही आरोपींना निर्दोष घोषित केले आहे. न्यायालयाने म्हटले की, स्फोटासाठी वापरलेल्या दुचाकीचे मालकी हक्क साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर नव्हते.
News18
News18
advertisement

मात्र मालेगावमध्ये यापूर्वी 2006 मध्येही बॉम्बस्फोट झाला होता. त्या प्रकरणात इंदौरचा रहिवासी संदीप डांगे याचे नाव समोर आले होते. संदीप डांगे गेली 19 वर्षे एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत आहे. त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मात्र आजतागायत तपास यंत्रणेला त्याचा मागमूस लागलेला नाही. 2006 मधील बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 9 जणांना 2016 मध्ये निर्दोष ठरवण्यात आले होते.

advertisement

कोण आहे मोस्ट वाँटेड संदीप डांगे?

संदीप डांगे इंदौरच्या लोकमान्य नगरमध्ये राहायचा. त्याने संगणक अभियांत्रिकी (कंप्युटर इंजिनिअरिंग)चे शिक्षण घेतले आहे. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जोडलेला होता. मात्र नंतर संदीप आणि इतर काही पदाधिकाऱ्यांनी संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संदीपचे नाव एका अतिरेकी संघटनेशी जोडले गेले.

संदीपला ओळखणारे लोक सांगतात की तो खूपच शांत स्वभावाचा होता. त्याचे वडील विश्वास डांगे आजही लोकमान्य नगरमध्ये राहतात. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान आणि त्यानंतरही एनआयएचे अधिकारी अनेकदा इंदौरला आले आणि संदीपबाबत चौकशी केली. मात्र संदीपने कोणाशीही संपर्क साधलेला नाही. अगदी त्याने आपल्या वडिलांशीही कधीच संपर्क केला नाही. संदीपबाबत माहिती मिळवण्यासाठी एनआयएची टीम इंदौरमध्ये प्रत्येक वेळी आली पण प्रत्येक वेळी त्यांना निराशाच पदरात पडली.

advertisement

19 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं?

8 सप्टेंबर 2006 रोजी मालेगावमध्ये चार बॉम्बस्फोट झाले होते. त्यापैकी तीन स्फोट हमीदिया मशिदीत आणि एक मुशवरत चौकात झाला होता. या स्फोटांत सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि 101 जण जखमी झाले होते. याप्रकरणी आजाद नगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे क्र. 95/06 आणि 96/06 नोंदवण्यात आले होते.

advertisement

त्यानंतर 13 सप्टेंबर 2006 रोजी मोहम्मदिया मशीद शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये एक बनावट बॉम्ब सापडला होता आणि मालेगाव सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 3088/2006 नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात संदीप डांगे देखील आरोपी होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

सुरुवातीला या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र एटीएसकडे होती. मात्र नंतर ही चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) सोपवण्यात आली.

मराठी बातम्या/देश/
मालेगाव बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड 19 वर्षांपासून बेपत्ता, NIA शोधून थकली; संदीप डांगे कुठे आहे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल