मुंबई: सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यात एका महिलेला सिगारेट ओढण्यावरून विरोध करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये संबंधित महिला रेल्वेत सिगारेट ओढण्यावर ठाम असल्याचे दिसते आणि ती त्या पुरुष प्रवाशाला व्हिडिओ डिलिट करण्यास सांगते.
advertisement
तुम्ही व्हिडिओ बनवत आहात. हे खूप चुकीचे आहे. त्याला सांगा की माझा व्हिडिओ काढू नका आणि तो डिलिट करा, असे ती महिला त्या व्यक्तीला व्हिडिओ रेकॉर्ड करताना पाहून म्हणते. जेव्हा ती महिला त्याला रेकॉर्डिंग करू नकोस असे सांगते, तेव्हा पुरुष प्रवासी तिला उत्तर देतो, सिगारेट ओढणे बेकायदेशीर आहे. बाहेर जाऊन सिगारेट ओढा.
हा वाद वाढत असताना महिला उत्तर देते, मी तुमच्या पैशांनी सिगारेट ओढत नाहीये. ही तुमची ट्रेन नाही. जा, पोलिसांना बोलवा.
हे संभाषण पाहणाऱ्या एका दुसऱ्या प्रवाशाने रागात त्या महिलेला म्हटले, हा एसी डबा आहे. तुम्हाला माहित नाही का की इथे सिगारेट ओढण्यास परवानगी नाही?
एका एक्स वापरकर्त्याने लिहिले की- सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे हे इतर लोकांच्या हक्कांचे उल्लंघन आहे आणि त्यांनी त्या महिलेवर कारवाईची मागणी केली.
सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे हे इतरांच्या हक्कांचे उल्लंघन आहे. ट्रेनसारख्या ठिकाणी अशा कृत्यांना अजिबात सहन करू नये. रेल्वे मंत्रालयाने (RailMinIndia) दंड आणि कठोर शिक्षा दोन्ही लादल्या पाहिजेत, असे मंजुल खट्टर नावाच्या युझर्सने म्हटले.
खट्टर यांच्या पोस्टला उत्तर देताना- रेल्वे सेवा, जे भारतीय रेल्वेच्या प्रवाशांना मदत पुरवणारे एक अधिकृत एक्स खाते आहे. त्यांनी म्हटले की- या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे.
अन्य एका युझरने म्हटले की, प्रवासी उघडपणे सिगारेट ओढत आहे. पण तिला वाटते की व्हिडिओ काढणे बेकायदेशीर आहे. चालत्या ट्रेनच्या एसी डब्यात ती महिला सिगारेट ओढत होती. जेव्हा सह-प्रवाशांनी आक्षेप घेतला आणि पुराव्यासाठी व्हिडिओ काढला, तेव्हा तिने 'वुमन कार्ड' खेळायला सुरुवात केली.