वैशाली, 13 नोव्हेंबर : पारंपरिक शेतीच्या तुलनेत फळबाग, फूलबाग आणि भाजीपाला लागवडीतून शेतकरी बांधव चांगलं उत्पन्न मिळवू लागले आहेत. सणासाठी, शुभकार्यासाठी फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे सणासुदीच्या काळात फुलांना बाजारात चांगला भाव मिळतो. विशेषतः झेंडूच्या फुलांना. परिणामी या फुलांची लागवड शेतकरी बांधवांच्या आयुष्यात आनंद घेऊन येते.
बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील रहिवासी शिवचंद्र कुमार यांनी 1 एकरात झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र ते या शेतीतून अवघ्या 4 महिन्यांत तब्बल 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवतात.
advertisement
फक्त जाळं नाही, करंट देऊन पकडतात मासे, तोही 220 वोल्टचा!
शिवचंद्र सांगतात की, त्यांच्या घरची परिस्थिती फार हलाखीची होती. पोटभर जेवणासाठीही त्यांच्याकडे पैसे नसायचे, वडिलांच्या निधनानंतर तर परिस्थिती आणखी बिघडली. त्यांनी मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडे मदत मागितली, मात्र मदत मिळू शकली नाही. मग त्यांनी बाजारातील मागणी पाहून झेंडूचं उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अगदी काहीच दिवसांतच त्यांना आपल्या मेहनतीचं फळ मिळालं.
दिवाळीतील फराळामुळे वजन वाढू नये म्हणून आहार कसा असावा? आहार तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
त्यांच्या शेतातील फुलांना बाजारात दररोज मागणी असते, मात्र सणासुदीच्या काळात तर प्रचंड विक्री होते. आता त्यांना 1 कट्ठा जागेतील फुलांच्या विक्रीतून 10 हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं. अशाप्रकारे 1 एकरातून 4 महिन्यांत त्यांची 2 लाख रुपयांची कमाई होते. मात्र यासाठी ते मेहनतही तशीच घेतात. सकाळी 6 वाजता ते स्वतः बाजारात जाऊन फूलविक्री करतात.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
